पत्राचाळ जामीन घोटाळा : ‘ईडी’समोर जबाब दिलेल्या स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी

पत्राचाळ जामीन घोटाळा : ‘ईडी’समोर जबाब दिलेल्या स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीसमोर जबाब नोंदविलेल्या स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. पाटकर यांनी ईडीला याबद्दल माहिती देत त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊतांच्या विरूद्ध दिलेला जबाब बदलावा, यासाठी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासह राऊतांच्या विरोधातील साक्ष मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात आहे, असा आरोप पाटकर यांनी केला आहे.

गोरेगावातील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात विक्रीसाठी बांधण्यात येत असलेल्या प्रस्तावित मेडोज इमारतीमध्ये १०० हून अधिक फ्लॅट बनावट पद्धतीने बूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात समोर आली होती. या प्रकल्पाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास ईडी करत आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news