पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा राखी पौर्णिमे निमित्त पुणे येथील एका भाविकाने श्री विठ्ठलाला दोन तोळे सोन्याची राखी अर्पण केली आहे. ज्ञानेश्वर रोहीदास भुरूक व विक्रम रोहीदास भुरूक रा. धायरी, जि. पुणे यांनी त्यांच्या आईच्या नावे इंदुबाई रोहीदास भुरूक यांनी आज विठ्ठलास सोन्याची राखी अर्पण केली.
भाविकाकडून विठ्ठलाला अर्पण केलेली ही दोन तोळे सोन्याची राखी असून, या राखीची अंदाजीत रक्कम रू. १,१०,०००/ रूपये इतकी आहे. ही राखी भेट स्वरूपात विठुरायाला अर्पण करण्यात आली.
यावेळी विक्रम रोहीदास भुरूक यांचा स्त्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते " श्री" चे उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर रोहीदास भुरूक व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.
पहा व्हिडिओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर
https://youtu.be/64iOYYZztvo