कल्‍याण सिंह : राम जन्‍मभूमी आंदोलनाचे नायक | पुढारी

कल्‍याण सिंह : राम जन्‍मभूमी आंदोलनाचे नायक

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन  : भारतीय जनता पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री कल्‍याण सिंह यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासह मान्‍यवरांनी कल्‍याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.

कल्‍याण सिंह हे जनतेच्‍या ह्‍दयात स्‍थान निर्माण केलेले प्रखर राष्‍ट्रवादी नेता होते. ते राम जन्‍मभूमि आंदोलनाचे नायक होते.

राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद

मी माझे दु;ख शब्‍दात व्‍यक्‍त करु शकत नाही. कल्‍याण सिंह एक राजकीय नेता, अनुभवी प्रशासक आणि महान व्‍यक्‍ती होते. उत्तर प्रदेशच्‍या विकासामध्‍ये त्‍यांनी बहुमूल्‍य योगदान दिले. ते समाजातील कोट्यवधी वंचित आणि दुर्बल घटकांचा आवाज होते. त्‍यांनी शेतकरी, युवक आणि महिला सशक्‍तीकरणासाठी विशेष प्रयत्‍न केले. त्‍यांनी देशासाठी दिलेले सर्मपण भावी पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मी माझ्‍या मोठ्या भावाला गमावले आहे. कल्‍याण सिंह १९९१मध्‍ये उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री झाले. बाबरी मशीद पाडण्‍यात आली त्‍यावेळी ते मुख्‍यमंत्री होती. यानंतर त्‍यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिला . यानंतर त्‍यांनी खासदार आणि राज्‍यपाल म्‍हणून जबाबदारी पार पाडली होती.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

उत्तर प्रदेशमध्‍ये जनसंघ आणि भाजपच्‍या उभारणीत कल्‍याण सिंह यांचा सिंहाचा वाटा होता. पक्षाच्‍या विचारधाराच महत्त्‍वाची असते. या विचारधारेपुढे सत्तेचे महत्त्‍व किती कमी असते, हे त्‍यांनी आपल्‍या विचार आणि कृतीतून दाखवून दिले. त्‍यांनी पक्षाची विचाराधार सर्वात महत्त्‍वाची  असते, ही शिकवण आम्‍हाला दिली. लोकनेते कल्‍याण सिंह यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कल्‍याण सिंह यांनी लाखो कार्यकर्त्यांना पक्षाची सेवा करण्‍यासाठी तयार केले. त्‍यांनी केलेले कार्याची छाप नेहमीच आमच्‍या मनात राहिल.

केंद्रीय मंत्री अमित शहा

कल्‍याण सिंह यांनी दोनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्रीपद भूषवले. यानंतर त्‍यांनी हिमाचल प्रदेश आणि राजस्‍थान राज्‍यापल पद भूषवले होते. भारतीर राजकारणात त्‍यांनी बहुमूल्‍य योगदान दिले. त्‍यांच्‍या निधनाने केवळ उत्तर प्रदेशच नाही तर देशातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची हानी झाली आहे.

बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार

Back to top button