नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दीक्षाभूमीला भेट

अमित शाह
अमित शाह
Published on
Updated on

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी आज (शनिवार) नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देत अभिवादन केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्‍थित होते.

यावेळी त्‍यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ.राजेंद्र गवई, प्रा. डी. जे. दाभाडे, प्रा.आगलावे, विलास गजघाटे, भंते दीपंकर आदींनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

मान्यवरांना सन्मानचिन्ह, शाल आणि 'बुद्ध अँड हिज धम्म' हे पुस्तक देण्यात आले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news