नांदेड : महाराष्‍ट्राच्या साडेतीन शक्‍तीपीठे नारीशक्‍ती या चित्ररथाचे माहूरगड येथे सादरीकरण हाेणार

साडेतीन शक्‍तीपीठे नारिशक्‍ती चित्ररथ
साडेतीन शक्‍तीपीठे नारिशक्‍ती चित्ररथ

श्रीक्षेत्र माहूर; पुढारी वृत्तसेवा प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठ दर्शवलेल्‍या नारिशक्ती हा चित्ररथ सहभागी झाला होता. या चित्ररथाचे विशेष सादरीकरण उद्या (गुरुवार) श्री क्षेत्र माहूरगड येथे होणार आहे.

जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातलेल्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा व्दितीय क्रमांक मिळाला आहे. या चित्ररथाचे प्रदर्शन माहूरगड येथे करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कळविले आहे. चित्ररथाचा देखावा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांना भेट देणाऱ्या भाविकांना व सर्वसामान्यांना पाहता यावा यासाठी हे प्रदर्शन माहूर येथे होणार आहे.

सर्व नागरीक व भावीकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ना.सुधीर मुनगंटीवार व आ. भीमराव केराम यांनी केले आहे. चित्ररथाचे स्वागत श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे करणार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news