pari paswan
pari paswan

नशेचे पदार्थ देऊन ‘पॉर्न’ बनवलं : माजी मिस इंडिया युनिव्हर्स परी पासवान

पुढारी ऑनलाईन :   माजी मिस इंडिया युनिव्हर्स परी पासवान हिने  सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुंबईतील एका प्रोडक्शन हाऊसने नशेचे पदार्थ टाकून पॉर्न व्हिडिओ शूट केल्याचा आरोप तिने  आहे. यासंदर्भात तिने पोलिसांत तक्रार दिली आहे. हे प्रकरण काय आहे? पाहुया…

परी पासवान एक मॉडेल आहे. मी काम शोधण्यासाठी मुंबईला गेली होती. तिथे माझ्या कोल्ड्रिंगमध्ये नशेचे पदार्थ टाकले. माझा पॉर्न व्हिडिओ शूट केला. जेव्हा मला याविषयी समजले. तेव्हा मुंबईत जाऊन मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, असे तिने म्‍हटलं आहे.

परीचा हुंड्यासाठी छळ?

झारखंडमधील धनबाद परीच्या सासरच्यांनी तिच्या विरोधात आरोप केला आहे. पॉर्न चित्रपटांमध्ये तिने काम केल्याचा आरोप त्‍यांनी परीवर केला आहे.

दुसरीकडे परीने हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सासरचे लोक  माझी  बदनाम व्हावी. यासाठी हा आरोप करत असल्याचे परीने म्हटले आहे.

परी झारखंडची आहे. तिने २०१९ मध्ये मिस इंडिया युनिव्हर्स हा किताब जिंकला होता. कतरासच्या नीरज कुमारशी तिचे लग्न झाले होते. आता तिचे सासरचे लोक हुंडा मागत आहेत. त्यांनी छळ केल्याची तक्रार केल्याने तिच्या पतीला पाेलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचलं का ? 

logo
Pudhari News
pudhari.news