जेम्स बाँड सिरीजमधील २५ वा चित्रपट ‘या’ दिवशी भारतात होणार प्रदर्शित

जेम्स बाँड सिरीजमधील २५ वा चित्रपट ‘या’ दिवशी भारतात होणार प्रदर्शित
Published on
Updated on

डॅनियल क्रेग साकारात असलेला जेम्स बाँड या सुप्रसिद्ध अॅक्शन चित्रपट सिरीजमधील २५ वा चित्रपट या महिन्यात भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नो टाईम टू डाय' या बाँडपटात डॅनियल क्रेग शेवटचा जेम्स बाँड साकारणार आहे. हा ००७ एजंट भारतात ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात क्रेगसोबत रॅमी मालेक, साफीन, राल्फ फिनेस, लिआ सायडोक्स हे कलाकारही दिसणार आहेत.

नो टाईम टू डाय या चित्रपटात लशाना लिंच ही देखील नवी सिक्रेट एजंट नाओमी साकारणर आहे. ती बाँड निवृत्त झाल्यानंतर त्याची जागा घेते. या चित्रपटाच्या नव्या अॅक्शन पॅक्ड ट्रेलरवरून या चित्रपटात जेम्स बाँड आपल्या निवृत्तीतून बाहेर येतो. तो आपल्या सीआयए मधील एका जुन्या मित्राला मदत करतो. त्याचा सामना एका धोकादायक तंत्रज्ञान हातात असलेल्या व्हिलनशी होतो.

या चित्रपटात अकॅडमी पुरस्कार विजेता अभिनेता रॅमी मालेक व्हिलन म्हणून काम करत आहे. त्यामुळे या चित्रपटाची चाहते चातकासारखी वाट पाहत आहे. डॅनियल क्रेगचा हा शेवटचा जेम्स बाँड पट आहे. त्याने आतापर्यंत ताकदीने जेम्स बाँड साकारला आहे. नव्या ट्रेलरवरुन तो चित्रपटात धमाल करण्यासाठी सज्ज असल्याचे जाणवते.

हा चित्रपट भारतात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट फक्त इंग्रजी नाही तर हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगु, मल्याळम, पंजाबी, गुजराती, भोजपुरी, बंगाली भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचले का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news