चंद्रपूर जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला; धाकट्याने केली थोरल्याभावासह वहिणीची हत्या

चंद्रपूर जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला; धाकट्याने केली थोरल्याभावासह वहिणीची हत्या

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : भावा-भावामध्ये मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या घराच्या रस्त्याच्या जागेवरून झालेल्या भांडणातून धाकट्याने थोरल्या भावासह वहिणीची निर्घूण हत्या केली. ही घटना सावली तालुक्यातील गायडोंगरी या गावी सोमवारी (दि. 5) रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. मनोहर निंबाजी गुरुनुले (वय 62), शारदा मनोहर गुरुनुले (वय 50) अशी मृतांची नावे आहेत. तर धनराज निंबाजी गुरुनुले (वय 52) असे आरोपी भावाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सावली तालुक्यातील गायडोंगरी येथील रहिवासी मृत मनोहर निंबाजी गुरुनुले, शारदा मनोहर गुरुनुले व आरोपी धनराज निंबाजी गुरुनुले हे भाऊ भाऊ एकाच घरी विभक्त राहत होते. मागील दहा वर्षांपासून धाकटा व थोरल्या भावांमध्ये रस्त्याच्या जागेवरून वाद सुरू होता. त्यामुळे त्यांचे नेहमीच जागेकरीता भांडण होत असे.

सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास रस्त्याच्या जागेवरून भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने धाकट्याने लोखंडी वस्‍तूने थोरल्यावर वार केला. नवऱ्याला वाचविण्याकरीता पत्नी धावून आली. तर तिलाही लोखंडी वस्‍तूने मारले आणि ती गंभीर जखमी झाली. दरम्‍यान नव-याचा जागीच मृत्‍यु झाला तर पत्‍नीला गडचिरोली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
सावली पोलिसांना या घटनेबाबत स्‍थानिकांनी माहिती दिली. आरोपी धाकट्याभावा विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. दुहेरी हत्या काडांने सावली तालुका हादरला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news