इचलकरंजी : गणपती विसर्जन करताना २२ वर्षीय युवक पंचगंगेत गेला वाहून | पुढारी

इचलकरंजी : गणपती विसर्जन करताना २२ वर्षीय युवक पंचगंगेत गेला वाहून

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : घरगुती गणपतीचे विसर्जन करीत असताना स्वप्नील मारुती पाटील (वय 22, रा. गल्ली नंबर 8, दत्तनगर कबनुर) हा रुई येथील युवक पंचगंगा नदीत वाहून गेला. तर नागरिकांना विशाल पाटील या युवकाला वाचविण्यात यश आले. सोमवारी दुपारी 4.30 सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे स्वप्नीलला पोहायला येत होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

सोमवारी घरगुती गणपतीचे विसर्जन असल्याने हातकणंगले तालुक्यातील रुई येथे पंचगंगा नदीवर मोठी गर्दी होती. दुपारी 4.30 च्या सुमारास स्वप्नील पाटील हा मित्रांसह घरातील गणपती विसर्जनासाठी रुई येथे आला होता. इंगली गावाकडील बाजूस स्वप्नील गणपती विसर्जन करीत होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.

Back to top button