आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनने आज ( दि. १० ) ऑलिम्पिक गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे सांगितले. लॉस एंजिल्स येथे होणाऱ्या २०२८ च्या आलिम्पिक गेम्समध्ये क्रेकेटचा सामावेश होण्यासाठी आयसीसी विशेष प्रयत्न करणार आहे.
अमेरिकेत जवळपास तीन कोटी लोक क्रिकेटचे चाहते आहेत. त्यामुळे २०२८ च्या एलए ऑलिम्पिक क्रिकेटच्या ऑलिम्पिक वापसीसाठी उत्तम वर्ष आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट फक्त एकदाच खेळले गेल होते. १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फक्त दोन संघांनी सहभाग घेतला होता. हे दोन संघ म्हणजे ग्रेट ब्रिटन आणि आयोजक फ्रान्स. जर २०२८ च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर १२८ वर्षानंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये दिसणार.
आयसीसीचे संचालक ग्रेग बारक्ले यांनी सांगितले की, क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याने खेळाचा आणि ऑलिम्पिकचाही फायदा होणार आहे.
ते म्हणाले 'प्रथम आयसीसीच्या वतीने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशन, टोकियो २०२० आणि जपानच्या लोकांचे अभिनंदन करतो. त्यांनी अत्यंत कठिण काळात उत्तमरित्या ऑलिम्पिकचे आयोजन केले. संपूर्ण जग एकाच ठिकाणी पाहण्याची कल्पना पाहणे अद्भुत होते. या सगळ्याचा क्रिकेटही भागीदार झाला तर आनंदच होईल.'
बारक्ले पुढे म्हणाले की, 'आमचा खेळ या बोलीसाठी एकत्र आहे, भविष्यात क्रिकेट जगतात ऑलिम्पिकही एक भाग असलेला आम्हाला पहायचे आहे. आमच्या खेळाला शंभर कोटीपेक्षा जास्त चाहतावर्ग आहे. त्यातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त चाहत्यांना ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पहावयास आवडेल.
'ऑलिम्पिमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यास त्याचा चांगला फायदा होईल अशी आमची धारणा आहे. पण, आम्हाला हेही माहीत आहे की इतके खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होण्यासाठी आतूर आहेत त्यामुळे क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होणे सोपी गोष्ट नाही. पण, आम्हाला असे वाटते की क्रिकेट आणि ऑलिम्पिक यांची ग्रेट भागीदारी होण्यासाठी पाऊल टाकण्याची ही योग्य वेळ आहे.'
क्रिकेटचा बर्मिंगहॅममधील २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत समाविष्ट होणार आहे. यामुळे ऑलिम्पिकसाठी क्रिकेटची दावेदारी सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. आयसीसी ऑलिम्पिक वर्किंग ग्रुपचे अध्यक्षपद इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे संचालक इयान वॉटमोर यांच्याकडे देण्यात येणार आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : बदलती शिक्षण पद्धती स्वीकारा
https://youtu.be/N0nIr_3Sst8