Bhool Bhulaiyaa 2 : अवघ्या तीनच दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई; कंगनाला दिली टक्कर

Bhool Bhulaiyaa 2 : अवघ्या तीनच दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई; कंगनाला दिली टक्कर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा 'भूल भुलैया २' (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २० मे रोजी चित्रपट रिलाज झाल्यानंतर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. नुकतेच 'भूल भुलैया २' चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५५.९६ कोटींची कमाई केली आहे.

कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया २' (Bhool Bhulaiyaa 2) हा २० मे रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतले. या चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या आधीच्या चित्रपटापेक्षा भरघोस कमाई केली आहे. 'भूल भुलैया २' या चित्रपटाने पहिल्या दिवशी १४.११ कोटींची, दुसऱ्या दिवशी (शनिवारी, 2१ मे) रोजी १८.३४ कोटींची आणि तिसऱ्या दिवशी (रविवारी, २२ मे) रोजी २३.५० कोटींची भरघोस कमाई केली. यावरून फक्त तीनच दिवसांत कमाईचा आकडा एकूण ५५.९६ कोटींची घरात पोहोचला आहे.

कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया २' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी (१०.५० कोटी) आणि अक्षय कुमारचा बच्चन पांडे (१३.२५ कोटी) चित्रपटांना मागे टाकले आहे. तर याआधीच्या कार्तिक 'पति पत्नी और वो' (३५.९४ कोटी) 'लुका छिपी' (३२.१३ कोटी), 'लव आज कल' (२८.५१), 'सोनू के टीटू की स्वीटी' (२६.५७ कोटी) या चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहे.

कंगनाला दिली टक्कर

कार्तिकचा हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा हिंदी ओपनिंग चित्रपट बनला आहे. यासोबत 'भूल भुलैया २' टक्कर देण्यास बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतची 'धकड' हा चित्रपट सिल्व्हर स्क्रीनवर रिलीज झाला होता. परंतु, हा चित्रपट अयशस्वी ठरला. भूलै भूलैय्या २ हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया चित्रपटाचा दुसरा सीझन आहे.

भूलै भूलैय्या २ चित्रपटात कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. कार्तिकने या चित्रपटात 'रूह बाबा'ची आणि कियारा आडवाणीने 'रीत ठाकुर'ची भूमिका साकारली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news