‘काटा रूते कुणाला’ फेम स्नेहा वाघ सध्या काय करतेय?

स्नेहा वाघ
स्नेहा वाघ
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : सुप्रसिद्ध मराठी मालिका 'काटा रूते कुणाला' मधून छोट्या पडद्यावर स्नेहा वाघ हिने यशस्वी डेब्यू केला होता. यानंतर, अभिनेत्री स्नेहा वाघ हिने हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले. आपल्या शास्त्रीय नृत्य कौशल्याने तिने प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातली आहे.

स्नेहा एक उत्तम चित्रकार देखील आहे. शूटींगच्या व्यस्त शेड्युल्डमधून वेळ का़ढत स्नेहाने आपली चित्रकलेची आवड जपलेली आहे. एक्रेलीक पेंटींग्ज असो वा फ्री हँड स्कॅच असो स्नेहाचे हात कॅनव्हास लीलया फिरतात.

आपल्या या कलेबद्दल स्नेहा सांगते, "मला रंग खूप आवडतात. रिकाम्या वेळेत मला एखादा कागद मिळाला तर माझ्यातला चित्रकार जागा होतो.

मी अनेक रफ स्केच बनवले आहेत. जे मी पूर्ण केलेले नाहीत. माझ्या बाबांची इच्छा होती. माझे हे सर्व स्केच मी पूर्ण करावेत. त्या सर्व पेंटींग्जचे एक्जिबिशन भरवावे. कदाचित पुढे जाऊन त्याचा मी विचार  करेन !"

स्नेहाच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या आठवणीत ती भावूक होते.

स्नेहाला पुन्हा एकदा मराठीत काम करायचे आहे. मराठीत काम करणार का? असे विचारल्यानंतर तिने मला मराठीत काम करायला नक्की आवडेल, असे म्‍हटलं आहे.

आपल्या माणसांसोबत काम करण्याची भावना ही वेगळीच असते. त्यासाठी चांगल्या संधीची वाट पाहत असल्याचे तिने सांगितले.

हेही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news