बंगळूर : विधान परिषदेच्या सात जागांसाठी तिन्ही पक्षांतील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. बुधवारी अर्जांची छाननी करण्यात आल्यानंतर निवडणूक अधिकार्यांनी सर्वांचे अर्ज वैध असल्याचे सांगितले होते.
माघारीसाठी शुक्रवारी (दि. 27) रोजी दुपारी 3 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर बिनविरोध निवड झालेल्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. भाजप उमेदवार लक्ष्मण सवदी, चलवादी नारायणस्वामी, केशव प्रसाद, हेमलता नायक, काँग्रेस उमेदवार अब्दुल जब्बार, नागराज यादव, निजद उमेदवार टी. ए. श्रवण यांची विधान परिषद सदस्यपदी निवड करण्यात आली.