

कागल; बा. ल. वंदूरकर : कागल एसटी आगारातील वाहक रहिमखान मुलानी यांच्या दोन्ही मुलांनी सातासमुद्रापार डंका वाजविला असून त्यांच्या ब्राझील येथील डेफ ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय संघाकडून झालेल्या उत्तम कामगिरीची नोंद घेऊन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही बहीण – भावांचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली. सुबिया रहिमखान मुलानी आणि ताहीर रहिमखान मुलानी असे बहीण-भावाचे नाव आहे.
रहिमखान मुल्लानी कोल्हापुरात राजारापुरी येथील रहिवाशी आहेत. या बहीण – भावांचा चोवीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धा सोडून ब्राझील येथे स्पर्धेतही सहभाग होता. या स्पर्धेत भारतीय संघाने 8 गोल्ड, 1 सिल्व्हर, 1 बॉंझ मेडल मिळवून नवव्या क्रमांकावर स्थान प्राप्त केले. सुबिया मुलानी आणि ताहीर मुलांनी या भावा – बहिणीने त्यांच्या वैयक्तिक खेळ प्रकारात उत्तम कामगिरी करून भारतीय संघास अव्वल स्थान मिळवून देण्यास महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. भारतीय संघ मायदेशी परतला असता उत्तम कामगिरीची नोंद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व खेळाडूंना भेटीसाठी मेजवानीसाठी आमंत्रित करून त्यांच्याशी बातचीत करून मनमोकळेपणाने बोलून त्यांच्या जिद्द व आजवरच्या प्रवासाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कोल्हापूरच्या खेळाडूंचा सत्कार होणे ही नक्कीच कोल्हापूरवासीयांसाठी ही अभिमानास्पद घटना आहे.