पुढारी ऑनलाईन डेस्क: अफगाणिस्तान मध्ये तालिबान मधील संघर्ष आता मानवी जीवनाच्या मूळावर उठला आहे. मृत्यूचे भय आणि सैतानांच्या तावडीतून सुटण्याचे हरप्रकारे प्रयत्न याचे भयावह दृश्य अमेरिकन विमानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मिळते.
अमेरिकन सैन्याच्या विमानात तब्बल ८०० जण बसले आणि त्यांच्या डोळ्यातील भीती पाहून क्रू मेंबर्सन विमान उड्डाण करण्याचा निर्णय घेतला.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर लोक देश सोडून पळत आहेत.
अफगाणिस्तान आणि तालिबान मधील संघर्ष तेथील नागरिकांसाठी आता मृत्यूची चाहूल घेऊन येत आहे. राजधानी काबूल येथे हमीद करजई एअरपोर्टवर विमानाला लटकून देश सोडण्याच्या प्रयत्नात सोमवारी दोघांचा मृत्यू झाला होता.
अशाच प्रकारे भीती आणि हतबलतेमुळे १३४ मर्यादा असलेल्या विमानात तब्बल ८०० जण बसले.
अमेरिकी वायुदलाच्या केसी-१७ ग्लोबमास्टरचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर भयावह दृश्य समोर आले.
काबूल एअरपोर्टच्या रनवे वर विमानासोबत पळणाऱ्या लोकांच्या डोळ्यातील भीती स्पष्ट दिसते.
आता विमानाच्या आतील दृश्य समोर आल्यानंतर भीती काय असते याचे चित्रच जगासमोर उभे राहिले आहे.
बंदूकीच्या टोकावर उभ्या असलेल्या देशाला रामराम करत अफगाणिस्तानचे लोक बाहेर पडू इच्छितात.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाचा दरवाजा उघडताच अनेक अफगाणिस्ताचे लोक विमानात घुसले.
या विमानात इतके लोक पेलण्याची ताकद नाही. पण क्रू मेंबर्सनी कुणालाही बाहेर काढले नाही.
त्यांना घेऊनच उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. क्रू मेंबरचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्यांनी सर्वांना वस्तुस्थिती सांगितली आहे.
या ८०० प्रवाशांत ६५० अफगाण नागरिक होते.
अमेरिकेच्या या विशाल विमानात केवळ १३४ लोक बसू शकतात. विमानाच्या आत ८० लोक पॅलेटवर आणि साईडवॉल सीटवर ५४ लोक बसू शकतात. परंतु या विमानाचा फोटो आल्यानंतर बाकी लोक खाली बसल्याचे दिसत आहे.
२० वर्षांनंतर अफगाणिस्तानची सूत्रे तालिबानच्या हातात आली आहेत. लोक या हुकुमशाही राजवटीतून सुटका करून घेऊ पाहत आहेत.
अतिरेकी आणि क्रूर चेहऱ्यांना घाबरून अफगान लोक देश सोडत आहेत. अफगाणी लोक पुन्हा परावलंबी आयुष्य जगू इच्छित नाहीत.
त्यामुळेच तालिबानने कब्जा करताच लोक देश सोडून पळून जात आहेत.
डिफेन्स वन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार आजपर्यंत मिलिटरी विमानांनी केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमधील रेकॉर्ड आहे.
२०१३ मध्ये फिलिपाईनमध्ये आलेल्या भयंकर वादळावेळी अमेरिकेने आपल्या सी-१७ या विमानातून एकावेळी ६७० लोकांना बाहेर काढले होते.
पहा व्हिडिओ: काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले
https://youtu.be/0C9F33TFAhc