पुढारी ऑनलाईन डेस्क : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोला (Zomato) २ आठवड्यांत तिसरा मोठा झटका बसला आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते गेल्या साडेचार वर्षापासून कंपनीशी जोडले गेले होते. गेल्या काही दिवसांतील झोमॅटोतील हा तिसरा हाय-प्रोफाइल राजीनामा आहे. झोमॅटोचे फूड डिलिव्हरी ऑपरेशन्स सुरुवातीपासून कार्यान्वित करण्याचे काम गुप्ता यांना केले होते. मे २०२० मध्ये त्यांची झोमॅटोचे सह-संस्थापक म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी ते मुख्य कार्यकारी अधिकारी होते. "मी झोमॅटोमध्ये दीर्घकाळ एकमेव गुंतवणूकदार म्हणून राहिलो." असे गुप्ता यांनी त्यांच्या निरोपाच्या नोटमध्ये म्हटले आहे.
याच आठवड्यात Zomato चे न्यू इनिशिएटीव्ह हेड राहुल गंजू यांनी कंपनीतून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. याआधी झोमॅटोचे इंटरसिटी लिजेंड्स सर्व्हिसचे हेड सिद्धार्थ झावर यांनी राजीनामा दिला होता. आता मोहित गुप्ता झोमॅटोतून पायउतार झाले आहेत. गुप्ता २०१८ मध्ये फूड डिलिव्हरी सेगमेंटचे हेड म्हणून झोमॅटोमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर २०२१ मध्ये कंपनीमध्ये त्यांना सह-संस्थापक म्हणून स्थान मिळाले. तर गंजू यांची फूड डिलिव्हरीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. झोमॅटोमध्ये दाखल होण्यापूर्वी गुप्ता ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म Makemytrip चे सीईओ होते.
झोमॅटोच्या शेअरमध्ये यावर्षी ५० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. शुक्रवारी बीएसईवर झोमॅटोचा शेअर ०.७ टक्क्याने घसरून ६७.२० रुपयांवर बंद झाला. दरम्यान, कंपनीच्या फूड डिलिव्हरी व्यवसायातील वृद्धी मंदावली आहे. पण विक्री व्यवसायात २२ टक्क्यांची वाढ होऊन उलाढाल ६,६३१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
हे ही वाचा :