चिंतेची बाब ! नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा ; 56 गावांवर दुष्काळाचे सावट

चिंतेची बाब ! नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा ; 56 गावांवर दुष्काळाचे सावट

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर व बारामती तालुक्याला वरदान ठरलेल्या नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. पावसाने ओढ दिल्याने धरणावर अवलंबून असणार्‍या सुमारे 56 गावे व वाड्या-वस्तीवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. नाझरे धरणाची पाणीसाठा क्षमता 788 दशलक्ष घनफूट असून, 200 दशलक्ष घनफूट मृत साठा आहे. यंदा पाऊस ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

सध्या धरणात 129 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, त्यात 50 टक्के गाळाचे प्रमाण आहे. पाणीसाठा खूप कमी झाल्याने धरणावर अवलंबून असणार्‍या सर्व गावांना आठवड्यातून दोन वेळा पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. पाऊस लांबल्यास तीव— पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे. जेजुरी शहराची लोकसंख्या 25 हजार असून, देवाला येणारे भाविक, तसेच औद्योगिक वसाहतीत येणारे कामगार यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट अधिक दाट होणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news