झेलेन्स्की पुतीन यांच्याशी चर्चेला तयार; चर्चा झाली नाही तर तिसरे महायुद्ध अटळ

झेलेन्स्की पुतीन यांच्याशी चर्चेला तयार; चर्चा झाली नाही तर तिसरे महायुद्ध अटळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले की, "रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. जर दोन्ही देशांतील युद्ध संपले नाही, तर तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे." रशियन सेनेने युक्रेनच्या धरतीवर हायपरसोनिक राॅकेट्स डागायला सुरूवात केलेली आहे. (ukraine russia war)

रविवारी सीएनएन वृत्तवाहिनीशी माहिती देताना झेलेन्स्की म्हणाले की, "माझी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा आहे. मला असं वाटतं की, चर्चेशिवाय हे युद्ध संपू शकत नाही. मात्र, चर्चेचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि युद्ध सुरूच राहिले, तर याचा अर्थ तिसरे महायुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे."

यापूर्वी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेकोव यांनी दावा केला की, रशियन सैन्य युद्धाच्या २५ व्या दिवशी युक्रेनच्या सर्वांत जास्त जमिनीवर ताबा मिळवला आहे. असं सांगितलं जात आहे की, जिटोमीर परिसरात युक्रेनच्या सैन्य प्रशिक्षण केंद्रावरच रशियाने हल्ला केला आहे. ज्यामध्ये १०० हून अधिक युक्रेनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. (ukraine russia war)

दुसरीकडे युक्रेन सरकारने दावा केला आहे की, रशियन सैन्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत १४७०० सैनिक मारले गेले आहेत. त्याशिवाय ९६ एअरअक्राफ्ट, ११८ हेलिकाॅप्टर, २१ यूएव्ही, १४८७ लष्करी वाहने, ४४ एण्टी एअरक्राफ्टचे नुकसान करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news