आंध्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्‍यपदी वायएस. शर्मिला

वायएस शर्मिला. (संग्रहित छायाचित्र)
वायएस शर्मिला. (संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आंध्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्षपदी नुकत्‍याच काँग्रेस पक्षात दाखल झालेल्‍या माजी मुख्‍यमंत्री वायएसआर रेड्‍डी यांच्‍या कन्‍या वायएस शर्मिला ( YS Sharmila) यांची नियुक्‍ती झाली आहे. काँग्रेसने एका निवेदनातून त्‍यांच्‍या नियुक्‍ती जाहीर केली आहे. आंध्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष रुद्र राजू यांची काँग्रेस कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्‍यात आली आहे.
(YS Sharmila appointed Andhra Congress Chief)

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांनी ४ जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच त्‍यांनी वायएसआर तेलंगणा पार्टी (वायएसआरटीपी) काँग्रेसमध्ये विलीन करण्याची घोषणा केली होती. तेलंगणातील विधानसभा शर्मिला यांनी निवडणुकीपूर्वी ३० नोव्हेंबरच्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. (YS Sharmila appointed Andhra Congress Chief)

वायएसआर तेलंगणा काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्‍यानंतर त्‍यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस देशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे कारण तो सर्व समुदायांची सेवा करतो आणि सर्व वर्गांना एकत्र करतो, असे त्‍यांनी यावेळी नमूद केले होते. (YS Sharmila appointed Andhra Congress Chief)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news