Yaariyan 2 first look : दिव्या खोसलाचा यारिया २ फर्स्ट लूक, टीझर डेटही समोर

Yaariyan 2 first look
Yaariyan 2 first look

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट 'यारिया'च्या निर्मात्यांनी अखेर फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केला आहे. चित्रपटाच्या टीजर रिलीज डेटचाही खुलासा केला आहे. 'यारिया २' मध्ये अभिनेत्री दिव्या खोसला कुमार, मिजान जाफरी आणि पर्ल वी पुरी मुख्य भूमिकेत आहे. (Yaariyan 2 first look ) टीव्ही कलाकार पर्ल वी पुरी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.  (Yaariyan 2 first look )

हे पोस्टर दिव्या खोसला कुमारने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. दिव्या खोसला कुमार आणि मिजान जाफरीसोबत पर्ल वी पुरी देखील दिसत आहेत. मस्ती, ड्रामा, रोमांस आणि दृढ मैत्रीवर आधारित हा चित्रपट आहे. 'यारिया २'चे टीजर १० ऑगस्ट रोजी रिलीज होईल. दिव्या खोसला कुमारने लिहिलं, "माझ्या आईच्या आशिर्वादाने, मी आपल्या सर्वांसोबत 'यारिया २' चे पोस्टर शेअर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधिका राव, विनय सप्रूने केलं आहे. तुम्हा सर्वांची प्रेमाची गरज आहे. टीजर उद्या येईल, पाहत राहा."

या यश दासगुप्ता, वरीना हुसैन, अनस्वरा रंजन आणि प्रिया वारियर यासारख्या 'यारिया' २० ऑक्टोबर,२०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

'यारियां 2' हा चित्रपट 'यारिया' चित्रपटाचा (२०१४) सिक्वेल आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात हिमांशू कोहली आणि रकुल प्रीत सिंह यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दिग्दर्शन दिव्या खोसला कुमारने केले होते. आता दिव्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनय करताना दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news