Siddhu Moosewala : मुसेवाला हत्याकांडाचा तपास करीत असलेल्या 12 पोलीस अधिकाऱ्यांना वाय दर्जाची सुरक्षा

Siddhu Moosewala : मुसेवाला हत्याकांडाचा तपास करीत असलेल्या 12 पोलीस अधिकाऱ्यांना वाय दर्जाची सुरक्षा
पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 14,  Sidhu Moosewala : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्याकांडाचा तपास करीत असलेल्या दिल्ली पोलीस दलातील 12 अधिकाऱ्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पोलिसांच्या विशेष शाखेचे आयुक्त एच. जी. एस. धालीवाल, उपायुक्त मनिशी चंद्रा, राजीव रंजन, सहाय्यक आयुक्त ललित नेगी, हृदय भूषण, वेद प्रकाश, राहुल विक्रम, निरीक्षक रवींद्र जोशी, सुनील कुमार, विक्रम दहिया, निशांत दहिया, विनोद कुमार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवाला याची गेल्या 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पंजाबी गँगस्टर हरविंदर रिंदा याचा सहकारी लखबीर लांडा याने मुसेवाला हत्याकांडाचा तपास करीत असलेल्या पोलिसांवर हल्ला करण्याची धमकी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. या पार्श्वभूमीवर वरील 12 अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news