Wrestlers Protest : आंदोलक कुस्तीपटू आक्रमक, गंगा नदीत विसर्जित करणार ऑलम्पिक मेडल्स!

Wrestlers Protest : आंदोलक कुस्तीपटू आक्रमक, गंगा नदीत विसर्जित करणार ऑलम्पिक मेडल्स!

पुढारी ऑनलाईन डेस्क : wrestlers protest : कुस्तीगीर संघटनेचे प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आता नवी आघाडी उघडली आहे. कुस्तीपटूंनी आपली पदके गंगा नदीला अर्पण करण्याची घोषणा केली आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाने ट्विट करून याची माहिती दिली. यात त्याने म्हटलं की, 'आम्ही गंगा नदीला पवित्र मानतो आणि तिच्या प्रमाणेच पदकेही आमच्यासाठी पवित्र आहेत.'

गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून दिल्लीत कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. रविवारी (28 मे) दिल्ली पोलिसांनी कारवाई करत दिल्लीतील जंतर-मंतरवर येथून कुस्तीपटूंना ताब्यात घेतले आणि हे आंदोलन उठवण्याचा जोरदार प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर बजरंग पुनियाने माहिती दिली की, तो आणि त्याचे आंदोलक साथीदार आपापले ऑलिम्पिक मेडल गंगा नदीत विसर्जित करणार असून इंडिया गेटवर अमरण उपोषणाला बसणार आहे.

स्वाभिमानाशी तडजोड करुन जगणार नाही, साक्षी मलिकचे भावनिक पत्र

कुस्तीपटू साक्षी मलिकने ट्विटरवर एक पत्र शेअर केले असून त्यात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पत्रात म्हटलंय की, '28 मे रोजी आमच्यासोबत काय घडले ते तुम्ही सर्वांनी पाहिले. दिल्ली पोलिस आमच्याशी कसे वागले, किती निर्दयीपणे आम्हाला अटक करण्यात आली, हे तुम्ही सर्वांनी बगितले. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी गदारोळ घालून आमचे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाचा न्याय मागून काही गुन्हा केला आहे का? पोलिस आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहेत,' असा आरोप करत साक्षीने पुढे लिहिलय की, 'आता असे वाटू लागले आहे की आमच्या गळ्यात सजलेल्या या पदकांना काही अर्थ उरला नाही. ते परत करण्याच्या विचारानेच आम्हाला नकोसे झाले आहे. पण स्वाभिमानाशी तडजोड करूनही का जगायचे? पण आम्हाला आता या पदकांची गरज नाही कारण ते परिधान करून, ही यंत्रणा केवळ आम्हाला मुखवटा बनवून स्वतःचा प्रचार करते आणि नंतर नेहमीच शोषण करते. त्या शोषणाविरुद्ध बोललो तर ही यंत्रणा तुरुंगात टाकण्याची तयारी करते. पदक हे आमचे जीवन, आमचा आत्मा आहे. ते गंगेत वाहून गेल्यावर आमच्या जीवनालाही अर्थ उरणार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार आहोत. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता हरिद्वार येथे आम्ही आमची पदके गंगा नदीला अर्पण करणार आहोत.'

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news