घाऊक महागाई निर्देशांक २९ महिन्यांच्या निचांकी स्तरावर

घाऊक महागाई निर्देशांक २९ महिन्यांच्या निचांकी स्तरावर
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ महागाई निर्देशांकापाठोपाठ घाऊक महागाई निर्देशांकातही मोठी घट नोंदविण्यात आली असून सरत्या मार्च महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक 1.34 टक्के इतका नोंदविला गेला आहे. घाऊक महागाई निर्देशांकाचा हा गेल्या 29 महिन्यातला निचांकी स्तर आहे.

मार्चमध्ये खाद्यान्न व अखाद्यान्न श्रेणीतील वस्तू, खनिजे, रबर, प्लास्टिक उत्पादने, कच्चे तेल व नैसर्गिक वायू, वस्त्रे, पेपर आणि उत्पादने तसेच धातूंच्या किंमतीत घट झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सलग दहाव्या महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक कमी झाला आहे. गतवर्षीच्या मार्च महिन्यात हा निर्देशांक 14.63 टक्क्यांवर पोहोचला होता तर चालूवर्षीच्या मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्यात तो 3.85 टक्के इतका होता.

गेल्याच आठवड्यात सांख्यिकी मंत्रालयाने किरकोळ महागाई निर्देशांकाचे आकडे जाहीर केले होते. त्यानुसार मार्चमध्ये किरकोळ महागाई निर्देशांक 5.66 टक्के इतका नोंदविला गेला होता. हा गेल्या 15 महिन्यांतला निचांकी स्तर होता. महागाई कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ केली जाण्याची शक्यता मावळत चालली असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news