मास्को : पुढारी ऑनलाईन
तिसरे महायुद्ध झाल्यास अणवस्त्राचा वापर केला जाईल, हे महायुद्धामुळे जगाचा महाविनाश होईल, असा इशारा रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव यांनी दिला. यापूर्वीही युक्रेनविरोधात अणवस्त्र वापरण्याचा इशारा रशियाने दिला आहे. यावेळी सर्गेई लावरोव, " रशियाचे खेळाडू, पत्रकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधींवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पाश्चत्य देशांनी घेतला आहे. तो कधीच मान्य केला जाणार आहे.
रशिया-युक्रेन युद्ध हे सातव्या दिवशीही सुरुच राहिले आहे. रशियाकडून युक्रेनची राजधानी कीव्हसह मोठ्या शहरांवर बॉम्ब हल्ले होत आहेत. रशियाच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान होत आहे. आज सकाळी खार्किवमधील हॉस्पिटलवर हल्ला करण्यात आला. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी युद्धात रशियाचे सात हजार सैनिक ठार झाल्याचा दावा केला आहे. तसेच संपूर्ण जगाने पुतीन यांच्याविरोधात भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी केले. जोपर्यंत आमच्यावर बॉम्बहल्ले सुरु राहतील तोपर्यंत चर्चेचा उपयोग होणार नाही. युक्रेन युरोपचे हृदय आहे. युरोपने आता निर्णायक भूमिका घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
पोलंडमध्ये आज रशिया-युक्रेनमध्ये दुसर्या टप्प्यातील चर्चा होणार आहे. ही चर्चा आज किती वाजता होईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. चर्चेचा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वी रशियाने युक्रेनमधील कीव्ह, खार्किव आणि चेर्निहायव शहरांतील नागरी वस्त्यांवर बॉम्बहल्ले आणखी तीव्र केले आहेत.
हेही वाचलं का?