पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीचे मूल्य आणि प्रभाव ओळखण्यासाठी दरवर्षी २१ नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरदर्शन दिन म्हणून साजरा केला जातो. (World television day 2022) बातम्या, मनोरंजन, शिक्षण, हवामान, आरोग्य, खेळ आणि दैनंदिन माहितीसाठी टीव्ही हे एक महत्त्वाचे माध्यम आहे.
1924 साली जॉन लोगी बेअर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावला . यानंतर, 1927 मध्ये, फिलो फार्न्सवर्थ यांनी जगातील पहिला कार्यरत टेलिव्हिजन तयार केला, 01 सप्टेंबर 1928 रोजी त्याचे सादरीकरण करण्यात आले होते. जॉन लोगी बेयर्ड यांनी 1928 मध्ये रंगीत टेलिव्हिजनचा शोध लावला. तर टीव्हीचे सार्वजनिक प्रसारण 1940 पासून सुरू झाले.
हेही वाचा