World Environment Day : पर्यावरणासंदर्भात आज पंतप्रधानांचा ऑनलाइन संवाद

World Environment Day : पर्यावरणासंदर्भात आज पंतप्रधानांचा ऑनलाइन संवाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी (दि. ५) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिल्ली येथील विज्ञान भवनात अमृत धरोहर योजना जाहीर करणार आहेत. या योजनेंतर्गत भारतातील 75 रामसार स्थळावर पंतप्रधान लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे संपर्क साधून त्या अंतर्गत घेण्यात येणारे कार्यक्रम स्वतः पाहणार आहेत. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी 10 ते 12 या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांना लाइव्ह पाहण्यासह संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील 100 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मिशन लाइफ अंतर्गत प्लास्टिकमुक्त अभयारण्य शपथ, अभयारण्य परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड, पक्षी निरीक्षण व रामसार स्थळाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, पर्यावरण दिनानिमित्त थेट पंतप्रधानांसोबत विद्यार्थ्यांना चर्चा करता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news