Womens T20 WC Final : महिला टी20 विश्वचषक स्पर्धेवर ऑस्ट्रेलियाची मोहर

Womens T20 WC Final : महिला टी20 विश्वचषक स्पर्धेवर ऑस्ट्रेलियाची मोहर

पुढारी ऑनलाईन डेस्क :  दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मोनीने केलेल्य़ा शानदार अर्धशतकी खेळीमुळे १५७ धावाचे आव्हान आफ्रिकेला दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना द. आफ्रिका ६ बाद २० ओव्हरमध्ये १३७ धावांपर्यंत मजल मारू शकला.

सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल होता. फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या मोनीने केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे संघाने १५७ धावांपर्यंत मजल मारली. तिने ५३ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. यामध्ये तिने २ चौकार आणि २ षटकार लगावले. तिच्यासोबत गार्डनरने २१ चेंडूत २९ धावा केल्या. गोलंदाजी करताना आफ्रिकेची गोलंदाज मरिझाने कापने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर, खाकाने १ विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानााचा पाठलाग करताना आफ्रिकेला १३७ धावांपर्यंत मजल मारता आली. यामध्ये लोराने ४८ चेंडूत सर्वाधिक ६१ धावांची खेळी करत कडवी झुंज दिली. परंतु तिला ऑस्ट्रेलियाची गोलंदाज मेगनने बाद केले. लोरासह ट्रायॉनने २५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना गार्डनरने २ तर, जॉर्जियाने १ विकेट घेतली. या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा महिला टी20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news