Women’s IPL Auction : ‘महिला IPL’च्या लिलावातून बीसीसीआय करणार 4000 कोटींची कमाई!

Women’s IPL Auction : ‘महिला IPL’च्या लिलावातून बीसीसीआय करणार 4000 कोटींची कमाई!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Women's IPL Auction : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) बुधवारी (दि. 25) होणाऱ्या महिला आयपीएलच्या पाच संघांच्या लिलावातून किमान 4 हजार कोटी रुपयांची कमाई अपेक्षित आहे. या लिलावात अनेक मोठ्या कंपन्या बोली लावणार आहेत. मार्केट तज्ज्ञांच्या मते, संघांच्या लिलावात प्रत्येक संघ 500 ते 600 कोटी रुपयांना विकला जाण्याची शक्यता आहे.

पुरुष आयपीएल संघांच्या लिलावात काम केलेल्या एका व्यक्तीने पीटीआयला सांगितले की, 'महिला आयपीएलमध्ये भरपूर क्षमता आहे. काही संघांसाठी 500 कोटी किंवा त्याहून अधिक किमतीची बोली लागू शकते. 800 कोटींहून अधिकची बोली लागण्याची शक्यता कमी आहे पण बीसीसीआयला त्याबाबत कसलीच तक्रार असणार नाही.'

महिला आयपीएल संघ खरेदी करण्यासाठी 30 हून अधिक कंपन्यांनी 5 कोटी रुपयांची बोली कागदपत्रे खरेदी केली आहेत. यामध्ये पुरुष आयपीएल संघांच्या मालकीच्या 10 कंपन्यांचा समावेश आहे. अदानी ग्रुप, टोरेंट ग्रुप, हल्दीराम प्रभुजी, कॅप्री ग्लोबल, कोटक आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांनीही संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे. यात 2021 मध्ये दोन नवीन पुरुष आयपीएल संघ खरेदी करण्यात अयशस्वी ठरलेल्या कंपन्यांचाही समावेश आहे. (Women's IPL Auction)

पुरुष आयपीएल संघांपैकी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायझी महिला आयपीएलमधील संघ खरेदी करण्यात अधिक रस दाखवू शकतात. त्यांनी जागतिक स्तरावरील लीगमधील संघही विकत घेतले आहेत. (Women's IPL Auction)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news