तुळजापूर ; पुढारी वृत्तसेवा तुळजापूर मंदिरात मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने केवळ महिलांनाच प्रवेश चालू ठेवला होता. या निमित्ताने विराट स्त्रीशक्तीचे दर्शन घडले. हजारो महिलांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि संक्रांतीची पूजा केली.
तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुळजापूर शहर आणि परिसरातील तसेच देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भगिनींनी देवीच्या दर्शनासाठी खूप मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सुमारे दोन ते अडीच तास दर्शनासाठी वेळ लागत होता. सुवासिनी महिला वर्गाकडून तुळजाभवानी देवीची मकर संक्रांती निमित्त विशेष पूजा करण्यात आली. देवीच्या पादुकांवर तिळगुळ ठेवण्यात आले.
संपूर्ण मंदिर परिसरामध्ये महिला एकमेकींना कुंकू लावून मकर संक्रांतीनिमित्ताने एकमेकांना तिळगुळ आणि वाण देत होत्या, मंदिर परिसरात महिला वर्गाची मोठी गर्दी झाली होती. यावेळी मकर संक्रांतीचा मोठा उत्साह दिसून आला.
हेही वाचा :