मथुरेतील ईदगाह मशीद 'सर्वेक्षण' आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती | पुढारी

मथुरेतील ईदगाह मशीद 'सर्वेक्षण' आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

पुढारी ऑनलाईन डेस्क: मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादात सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.१६) मोठा निर्णय दिला आहे. शाही इदगाह मशीद मशिदीचे सर्वेक्षण करण्‍याच्‍या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशालार्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवावी, असे देखील न्यायालयाने आजच्या सुनावणीवेळी म्हटले आहे. (Shri Krishna Janmabhoomi)

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने शाही इदगाह मशीद समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १४ डिसेंबरच्या आदेशाला आज स्थगिती दिली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात वकील आयुक्त (कोर्ट कमिशनर) नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या अॅडव्होकेट आयुक्तांना मशीद परिसराचे सर्वेक्षण करायचे होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या आदेशानुसार, उच्च न्यायालयच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. (Shri Krishna Janmabhoomi)

एकूण १३.३७ एकर जमिनीच्‍या मालकी हक्‍काशी संबंधित हे प्रकरण आहे. श्री कृष्ण जन्मस्थानकडे १०.९ एकर जमिनीची मालकी हक्‍क आहे. शाही इदगाह मशिदीकडे अडीच एकर जमिनीचा मालकी हक्क आहे. . वकील हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभा पांडे आणि देवकी नंदन यांच्यामार्फत अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ASI सर्वेक्षणाची मागणी केली होती. याला अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने परवानगी दिली होती. (Shri Krishna Janmabhoomi)

यापूर्वी सर्वेक्षणाशी संबंधित आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले होते, तर शाही ईदगाह समितीने मथुरा जिल्हा न्यायालयातून सर्व प्रकरणे उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यास विरोध केला आहे. या मुद्द्यावर पुढील सुनावणी आता मंगळवारी २३ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे.

हेही वाचा:

 

Back to top button