पुढारी ऑनलाइन डेस्क : Manipur Women Atrocities Viral Video : मणिपूर हिंसाचारादरम्यान महिलांसोबत घडलेल्या अत्याचारप्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मणिपूर पोलिसांनी ट्विट करून दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. काल रात्री 9 पर्यंत तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. मणिपूर पोलिसांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.
मणिपूर पोलिसांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील चार मुख्य आरोपींना अटक : 03 (3) नॉन्गपोक सेकमाई पीएस, थौबल जिल्ह्यातील अपहरण आणि सामूहिक बलात्काराच्या जघन्य गुन्ह्यातील आणखी मुख्य आरोपींना आज अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 04 (चार) जणांना अटक करण्यात आली आहे. Manipur Women Atrocities Viral Video
मुख्यमंत्री एन बिरेन सिंह महत्त्वाची माहिती देत गुरुवारी सायंकाळी या प्रकरणी मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, दोन महिलांची विवस्त्र धिंड आणि त्यांच्यावरील अत्याचार प्रकरणी मुख्य गुन्हेगारासह आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हुइरेम हेरोदास मेईती (वय ३२) असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याला थौबल जिल्ह्यातून अटक करण्यात आली. बुधवारी समोर आलेल्या 26 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये ठळकपणे जमावाला निर्देशित करताना दिसत होता. इतर आरोपींनाही पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे,' असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री सिंह पुढे म्हणाले की, पोलिसांनी थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलिस ठाण्यात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली रात्रभर छापे टाकून गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर, गावकऱ्यांनी आरोपी हुइरेम हेरोदास मेईती याच्या घराला आग लावली आणि त्याच्या कुटुंबालाही बहिष्कृत केले असल्याचे त्यांनी सांगितले. Manipur Women Atrocities Viral Video
हे ही वाचा :