Manipur Women Sexually Assaulted : मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओ; अटक केलेल्या आरोपीची पोलिसांकडून माहिती | पुढारी

Manipur Women Sexually Assaulted : मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओ; अटक केलेल्या आरोपीची पोलिसांकडून माहिती

पुढारी ऑनलाइन डेस्क : Manipur Women Sexually Assaulted : मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारादरम्यान दोन-तीन महिलांची जमावाकडून विवस्त्रकरून त्यांची धींड काढत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेच्या दोन महिन्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण देशात उमटत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर आज सकाळी पोलिसांनी एका संशयित आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला अटक केली. आरोपीची माहिती पोलिसांनी उघड केली आहे.

एएनआयने ट्विटकरून याची माहिती दिली आहे. एएनआयच्या ट्विटमध्ये हुइरेम हेरोदास मेईतेई (३२ वर्षे) पेची अवांग लीकाई असे आरोपीचे नाव दिले आहे. सोबत त्याचा फोटोही जोडला आहे.

”मुख्य गुन्हेगार ज्याने हिरवा टी-शर्ट घातलेला होता आणि महिलेला धरून ठेवले होते, त्याला आज सकाळी योग्य ओळखीनंतर एका कारवाईत अटक करण्यात आली. त्याचे नाव हुइरेम हेरोदास मेईतेई (३२ वर्षे) पेची अवांग लीकाई”

पोलिसांनीच आम्हाला जमावात नेऊन सोडले; पीडितेचे आरोप

दरम्यान, या घटनेचे संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटत आहे. समाजाच्या सर्वच स्तरातून याचा निषेध करण्यात येत आहे. तर नुकतेच द इंडियन एक्सप्रेसने या पीडित महिलेकडून प्रत्यक्ष घटनेची माहिती घेतली. यावेळी या पीडितेने धक्कादायक खुलासे करत पोलिसांनीच आम्हाला जमावात नेऊन सोडले, पोलिस स्वतःच त्या जमावासोबत सामिल होते, असे आरोप केले. 18 मे रोजी पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत आणि पीडितेने फोनवरून दिलेल्या माहितीत तफावत आढळून येत आहे.

दोषींना माफी नाही – पंतप्रधान

संसदेच्‍या अधिवेशन सुरु होण्‍यापूर्वी माध्‍यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, मणिपूरमध्ये दोन्ही मुलींसोबत जे घडले ते अतिशय दुःखद आहे. मला या घटनेने खूप दु:ख झाले आहे. या प्रकरणातील दोषीला माफी मिळणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

घटनेवर बी-टाऊन कलाकारांनी व्यक्त केला संताप

या व्हिडिओनंतर अक्षय कुमार, ऋचा चड्ढा, उर्फी जावेदसह अनेक स्टार्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही घटना निंदनीय आहे. दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

‘मणिपूरमध्ये महिलांच्या विरोधात हिंसेचा व्हिडिओ पाहून अस्वस्थ झालोय. अपेक्षा करतो की, दोषींना इतकी कडक शिक्षा मिळाली की, कुणीही पुन्हा असे भयानक कृत्य करु नये.’ असे अक्षयकुमारने म्हटले आहे.

‘मणिपूरमध्ये जे झालं, ते केवळ मणिपूरसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी लज्जास्पद आहे.’ उर्फी जावेद

हे ही वाचा :

Manipur Violence : ‘आम्हाला पोलिसांनीच जमावात नेऊन सोडले’; मणिपूर व्हिडिओतील पीडितेची धक्कादायक माहिती

Parliament Monsoon Session first day : मणिपूर प्रकरणावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, उभय सदनांचे कामकाज बाधित

Manipur Violence : ‘लज्जास्पद! भयानक! अधर्म!’ मणिपूर घटना ही विकृतीचा कळस, बी-टाऊन कलाकारांचा संताप

SC sought report on Manipur : मणिपूरसंदर्भात वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Back to top button