Wimbledon 2022 Final : नोव्‍हाक जोकोविच विम्‍बल्‍डनचा ‘किंग’, २१ व्‍या ग्रँड स्‍लॅमवर कोरलं नाव

Wimbledon 2022 Final : नोव्‍हाक जोकोविच विम्‍बल्‍डनचा ‘किंग’, २१ व्‍या ग्रँड स्‍लॅमवर कोरलं नाव
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विम्‍बल्‍डन २०२२ च्‍या अंतिम सामन्‍यात ( Wimbledon 2022 Final ) सार्बियाचा अव्‍वल मानांकित टेनिसपटू नोव्‍हाक जोकोविच याने इतिहास रचला. त्‍याने ऑस्‍ट्रेलियाच्‍या निक किर्गिओस याचा पराभव करत २१ व्‍या ग्रँड स्‍लॅमला गवसणी घातली. त्‍याने हा सामना ४-६, ५-३, ६-४, ७-६ असा जिंकत विम्‍बल्‍डनमधील सलग चौथ्‍या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. तब्‍बल तीन तासांहून अधिक काळ रंगलेल्‍या या सामन्‍यात दोन्‍ही खेळाडूंनी उत्‍कृष्‍ट टेनिसचे प्रदर्शन करत क्रीडा रसिकांची मने जिंकली.

पहिल्‍या सेटमध्‍ये किर्गिओसची दमदार सुरुवात

पहिल्‍या सेटची सुरुवात दोन्‍ही खेळाडूंनी दमदार केली. पहिल्‍या सेटच्‍या पाचव्‍या गेममध्‍ये निक किर्गिओस याने जोकोविचची सर्विस तोडत ३-२ अशी आघाडी घेतले. यानंतर त्‍याने सर्वोत्‍कृष्‍ट प्रदर्शन करत ही आघाडी कायम ठेवत ६-४ असा पहिला सेट जिंकला. पहिल्‍या सेटमध्‍ये जोकोविचला किर्गिओसची सर्विस भेदता आली नाही. याचा फटका त्‍याला बसला.

Wimbledon 2022 Final :  दुसर्‍या सेटमध्‍ये जोकोविचचे कमबॅक

दुसर्‍या सेटमध्‍ये जोकोविचने कमबॅक केले किर्गिओसची सर्विस भेदण्‍यात त्‍याला यश आले. यानंतर त्‍याने ५-३ अशी निर्णायक आघाडीत घेत या सेटवरील आपली पकड मजबूत केली. किर्गिओसने आपली सर्विस कायम ठेवली. मात्र जोकोविचने ६-३ असा सेट जिंकत आपण अव्‍वल मानांकित टेनिसपटू सिद्‍ध केले.

तिसर्‍या सेटमध्‍ये उत्‍कृष्‍ट टेनिसचे प्रदर्शन

जोकोविचने दुसरा सेट जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसर्‍या सेटसाठी त्‍याने पहिल्‍या गेममध्‍ये किर्गिओसची सर्विस तोडण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र त्‍याने पहिली सर्विस कायम ठेवली. दोघांनी पहिल्‍या गेममधील चार सर्विस कायम ठेवण्‍यात यश मिळवले. मात्र पाचव्‍या गेममध्‍ये किर्गिओसची सर्विस ब्रेक करण्‍यात जोकोविचला यश आले. त्‍याने ५-४ अशी आघाडी घेतली. यानंतर आपली सर्विस कायम राखत त्याने हा सेट आपल्‍या नावावर केले.

चौथ्‍या सेट ठरला जोकोविचसाठी निर्णायक

सलग दोन सेट जिंकल्‍यामुळे आत्‍मविश्‍वास दुणावलेल्‍या जोकोविचने चौथ्‍या सेटमध्‍ये आपला अनुभव पणाला लावला. पाच गेमपर्यंत दाेघांनी आपली सर्विस कायम ठेवली. यानंतर सहाव्‍या  गेममध्‍यही किर्गिओसने सर्विस कायम राखली. यानंतर जाेकाेविचवर दडपण  वाढले. सहाव्‍या गेममध्‍ये जॉकोविचने नावाला साजेसा खेळ करत बराेबरी साधत सेट ६-६ केला. टायब्रेकरमुळे चाैथा सेट अत्‍यंत राेमहर्षक अवस्‍थेत पाेहचला. अखेर सलग दाेन गुण कमावत आघाडी घेतली. यानंतर जाेकाेविचने टायब्रेकर ७-३ करत विम्‍बल्‍डनवर आपलं नाव काेरलं.

विम्‍बडनचा 'चौकार'

सार्बियाचा अव्‍वल मानांकित टेनिसपटू नोव्‍हाक जोकोविच याने सलग चौथ्‍यांदा विम्‍बडनवर आपलं नाव कोरलं. तर कारकीर्दीतील सातव्‍यादा विम्‍बडनचे जेतेपद पटकावले. ग्रँड स्‍लॅम मधील आजवर तो ३१ अंतिम सामन्‍यांपर्यंत धडक मारल्‍याचा पराक्रमही त्‍याच्‍या नावावर आहे. टेनिसचा बादशाह अशी ओळख असणार्‍या रॉजर फेडरर याने आठ वेळा विम्‍बल्‍डन विजेतेपद पटकावले आहे. आता सातवेळा विम्‍बल्‍डनवर आपलं नाव कोरत जोकोविच फेडररच्‍या विक्रमापासून केवळ एक पाउल मागे आहे.

आक्रमक टेनिस खेळण्‍यासाठी प्रसिद्‍ध असणार्‍या किर्गिओस हा प्रथम विम्‍बल्‍डनच्‍या अंतिम सामन्‍यात धडक मारली होती. उपांत्‍य फेरीत रफाल नदालने माघार घेतल्‍याने त्‍याला पुढील चाल मिळाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news