वरुण-नताशा लवकरच होणार आई-वडील? सलमानच्या बिग बॉसमध्ये खुलासा

varun dhawan
varun dhawan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या 'भेड़िया' या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत 'भेड़िया' या चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनमध्ये तो बिझी आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी वरूण व क्रिती दोघेही बिग-बॉसच्या मंचावर पोहोचले होते. यावेळी या दोघांनीही सलमान खानसोबत काही गेम्स खेळत धमाल  मस्ती केली. यावेळी सलमानने वरूणच्या आयुष्याबाबत काही गोष्टीचा खुलासा केला.

वरुण धवन आणि क्रिती सेनॉनचा हा व्हिडीओ टीव्ही चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सलमान खान क्रिती आणि वरूणला सांगतो की, 'आपण एक गेम खेळणार आहोत, या गेमद्वारे चित्रपट व गाण्यांची नावे ओळखावी लागतील.' या गेमच्या शेवटी सलमान खान वरूणला एक लहान खेळणं भेट देतो. हे खेळणं घेतल्यानंतर मला अजून मुल नाही, मी या खेळण्याचं काय करू? असं वरूण सलमानला विचारतो.

यावर बिग बॉसच्या घरातील सदस्यांकडे बघत सलमान खान म्हणतो की, आता हा आला आहे, लवकरच मुलंही येईल. यानंतर वरुण धवन लाजतो. सलमान खानच्या इशाऱ्याने वरुण आणि नताशा लवकरच आई-वडील होणार असल्याची माहिती मिळतेय. परंतु, याबाबतची अधिकृत माहिती वरूणने दिलेली नाही.

    हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news