Salman- Shahrukh : सलमान- शाहरूखची जोडी पुन्हा पडद्यावर दिसणार?

Salman- Shahrukh
Salman- Shahrukh

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बॉलिवूडचा दंबग स्टार सलमान खान आणि किंग खान म्हणजे शाहरुख खान याची जोडी पडद्यावर पाहण्यास नेहमीच चाहते उत्सुक असतात. सलमान आणि शाहरुख ( Salman- Shahrukh ) दोघांनी एकत्रित केलेले 'करण अर्जुन' चित्रपट सुपरहिट ठरला. याआधी दोघेजण 'झिरो' चित्रपटातील एका गाण्यात धमाकेदार परफार्मन्स करताना दिसले होते. यानंतर मात्र, दोघेजण आपआपल्या 'टायगर ३' आणि 'पठाण' या चित्रपटात शूटिगमध्ये बिझी झाले. याच दरम्यान सलमान आणि शाहरुख याच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. दोघे सुपरस्टार पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार असल्याचे माहिती मिळत आहे.

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, निर्माता आदित्य चोप्रा चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. या चित्रपटात सलमान खान आणि शाहरुख खान यांची जोडी एकत्रित दिसणार आहे. सध्या आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाचे काम सुरू केले असून, चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले जात आहेत. या चित्रपटाचे शूटिंग २०२३ च्या शेवटी किंवा २०२४ च्या सुरुवातीला सुरू होऊ शकते, अशी देखील माहिती मिळत आहे.

या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि सलमान खान यांनीही एकत्रित डेट फिक्स केल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटात दोघांच्या मुख्य भूमिकेसोबत ॲक्‍शन सीन असणार आहेत. परंतु, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची धूरा कोण सांभाळणार यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. 'टायगर ३' आणि 'पठाण' चित्रपटाचा पहिला कट फायनल झाल्यानंतर या चित्रपटाची कथा दोन्ही अभिनेत्यांना सांगितली जाईल, असेही माहिती मिळतेय.

यावरून सलमान आणि शाहरूखची ( Salman- Shahrukh ) जोडी पुन्हा एकत्रित पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याआधी दोन्ही सुपरस्टार राकेश रोशन यांच्या 'करण अर्जुन' या चित्रपटात दिसले होते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news