‘… तर ते पाकिस्‍तानलाही हिंदू राष्‍ट्र बनवू शकतात’ बागेश्‍वर धामच्‍या धीरेंद्र शास्‍त्रींचे खळबळजनक विधान

‘… तर ते पाकिस्‍तानलाही हिंदू राष्‍ट्र बनवू शकतात’ बागेश्‍वर धामच्‍या धीरेंद्र शास्‍त्रींचे खळबळजनक विधान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुजरातचे लोक एकत्र आले तर केवळ भारतच नाही तर ते पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू शकतात, असे खळबळजनक विधान बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री ( Dhirendra Shastri ) यांनी एका प्रवचनावेळी केले.

शनिवार २७ मे रोजी सुरतमध्ये आयोजित प्रवचनात बोलताना धीरेंद्र शास्‍त्री म्‍हणाले की, "…ज्या दिवशी गुजरातचे लोक अशा प्रकारे एकजूट होतील, तेव्हा केवळ भारतच नाही तर आम्ही पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनेल."

नुकतेच बागेश्वर धामच्या प्रमुखाला मध्य प्रदेश सरकारकडून वाय श्रेणीचे सुरक्षा कवच मिळाले आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा देण्यात आली होती. धीरेंद्र शास्त्री यांचे कार्यक्रम त्यांच्या राज्यात आयोजित केले जात असतील तर त्यांना समान पातळीवरील सुरक्षा पुरवावी, असे आवाहनही  राज्य सरकारांना करण्‍यात आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news