Arjun Tendulkar : ‘तेंडुलकर’ने कंबर कसली, मुंबईच्या पहिल्या विजयासाठी उतरणार मैदानात?

Arjun Tendulkar : ‘तेंडुलकर’ने कंबर कसली, मुंबईच्या पहिल्या विजयासाठी उतरणार मैदानात?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करताना दिसत आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अर्जुनबाबत सातत्याने अशा पोस्ट शेअर केल्या जात आहेत, त्यामुळे या अष्टपैलू खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते, असे चाहत्यांना वाटते. अर्जुनने अद्याप एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. आज (दि. 21), आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी (CSK) होणार आहे, या सामन्यापूर्वी फ्रँचायझीने अर्जुनच्या अचूक यॉर्कर बॉलचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अर्जुनचा (Arjun Tendulkar) हा चेंडू पाहून चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले आहे की, आता हा खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी तयार आहे आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळावे. जसप्रीत बुमराहच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनने त्याच्या गोलंदाजीवर बरेच काम केलेले दिसते. बुमराह हा मुंबई इंडियन्स संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. याशिवाय भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान देखील मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे. (IPL 2022)

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) मुलगा अर्जुन गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला आहे. यावेळीही आयपीएल लिलावात फ्रँचायझीने त्याला ३० लाख रुपयांना विकत घेतले. (IPL 2022)

आयपीएलच्या 15 व्या हंगामात 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाची अवस्था बिकट आहे. संघाला सलग 6 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याचा अर्थ हा संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुंबईचा पुढचा सामना अज 21 एप्रिलला CSK विरुद्ध होणार आहे. सीएसके आणि मुंबई संघाची अवस्था या हंगामात जवळपास सारखीच आहे. संघाला आता सर्व सामने जिंकायचे आहेत. 16 एप्रिल रोजी झालेल्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबईला लखनौविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी मुंबई संघ व्यवस्थापनाला सल्ला दिला होता, ज्याची सध्या चर्चा होत आहे. खरेतर, क्रिकेट वेबसाइट क्रिकट्रॅकरवर आयोजित 'नॉट जस्ट क्रिकेट' या टॉक शोमध्ये अझहरने मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला होता. (IPL 2022)

अझहर यांनी शोमध्ये म्हटले होते की, आता मुंबईने आपली प्लेइंग इलेव्हन बदलण्याची आणि अर्जुन तेंडुलकरला मैदानात उतरवण्याची वेळ आली आहे. आता मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही नवीन खेळाडू असले पाहिजेत. अर्जुनला संधी देऊ शकता. तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. तेंडुलकर आडनाव जोडल्याने संघाचे नशीब बदलण्याची शक्यता आहे,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (IPL 2022)

ते पुढे म्हणाले की, जर तुम्ही टीम डेव्हिडला 8.25 कोटी रुपयांना खरेदी केले असेल, परंतु तुम्ही त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करत नाही. जे नक्कीच आश्चर्यकारक आहे. जर तुम्ही त्याला संधी देत ​​नसाल तर मग त्याचा संघात समावेश का करण्यात आला. जर तुमच्याकडे असे खेळाडू असतील तर तुम्ही त्यांना बेंचवर कसे बसवू शकता?, असा सवाल ही अझहर यांनी उपस्थित केला होता. (IPL 2022)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news