Mahabharat : अर्थसंकल्पात महाभारतातील ‘त्या’ श्लोकाचा उल्लेख का केला?

Mahabharat : अर्थसंकल्पात महाभारतातील ‘त्या’ श्लोकाचा उल्लेख का केला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२२ चा अर्थसंकल्प संसदेत नुकताच सादर केला. त्यांनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत अंतर्गत गतिशक्ती योजना अधोरेखित केली. निर्मला सीतारामन यांनी आपल्‍या भाषणादरम्यान महाभारतातील शांतीपर्वातील वर्णित राजधर्म अनुशासनाचा उल्लेख केला. (Mahabharat)

सीतारामन म्हणाल्या की, "यंदाच्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय लोकांचा कल्याण करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश असला तरी, राजधर्म निभावावे लागणार आहे." यावेळी सीतारामण यांनी महाभारतच्या शांतीपर्वातील ७२ व्या अध्यायातील ११ श्लोकचा उल्लेख केला. ज्यामध्ये युधिष्ठिर हा राजधर्मानुसार शासन करण्याची चर्चा करतो, त्यातबरोबर सामान्य लोकांच्या कल्याणाचाही विचार मांडतो.

शांतीपर्वात सांगितलं गेलं आहे की, "दापयित्वा करं धर्म्यं राष्ट्रं नित्यं यथाविधि । अशेषान्कल्पयेद्राजा योगक्षेमानतन्द्रितः ।।" या श्लोकचा अर्थ कोणत्याही राष्ट्राचा राजधर्म जनतेंच कल्याण क्षेमकुशल करण्यासाठीच आहे. शांतीपर्व हे महाभारतातील १२ पर्व आहे. त्यामध्ये धर्म, दर्शन आणि राजनीती, अध्यात्म ज्ञान यांच्या व्याख्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत. (Mahabharat)

या पर्वामध्ये महाभारतातील युद्ध झाल्यानंतर शोक व्यक्त करत बसलेल्या लोकांना युधिष्ठिर राजधर्माचे अनुशासन याबद्दल सांगतो. त्यांतर्गत तो मोक्ष कसा प्राप्त करायचा, याचंही विश्लेषण करतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news