Girlfriends Day : गर्लफ्रेंड सतत तक्रार का करत असतात? जाणून घ्या मानसशास्त्र काय म्हणते

Girlfriends Day : गर्लफ्रेंड सतत तक्रार का करत असतात? जाणून घ्या मानसशास्त्र काय म्हणते

पुढारी ऑनलाईन : वर्षभरात डे किंवा विशेष दिवस यांचे काही शॉर्टेज नाही. व्हॅलेंटाईन्स डे, फ्रेंडशिप डे, मदर्स डे, डॉक्टर्स डे, फादर्स डे असे खंडीभर डे साजरे केले जातात. त्यात एक सुंदरशी भर म्हणजे गर्लफ्रेंडस डे. होय १ ऑगस्टला गर्लफ्रेंड डे असतो आणि तो पाश्चात्य देशांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर साजराही केला जातो. हा दिवस साजरा करताना एका प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न या लेखातून करत आहोत. तो म्हणजे गर्लफ्रेंड, बायको सतत तक्रारी का करतात? National Girlfriends Day

बायका जास्त तक्रारी करतात, असे Ohio State Universityने केलेल्या एका संशोधनात दिसून आलं होतं. याचं कारणही तसंच आहे. तक्रार करण्यासाठी बायकांकडे विचारण्यासारखं बरंच काही असतं, कारण घरातील आणि कुटुंबातील बऱ्याच डोमेनचा ताबा त्यांच्याकडेच असतो.

पुरुषही तितकेच जबाबदार

या संदर्भात डॉ. स्टिव्ह रामसी यांनी लिंक्डइनवर एक लेखही लिहिला आहे. त्यामध्‍ये ते म्हणतात, "घर आणि कुटुंब याबाबतीत अधिक जबाबदारीने वागले पाहिजे, अशा प्रकारे महिलांची जडणघडण झालेली असते. शिवाय नातेसंबंधातील ताणतणाव महिलांच्या लवकर लक्षात येतात. जेव्हा गर्लफ्रेंड किंवा बायको एखाद्या गोष्टीची मागणी करते आणि ती पूर्ण होत नाही, तेव्हा काही तरी गडबड आहे, असे त्यांना वाटते; पण त्या सतत एकच मागणी करत राहतात आणि येथून गोष्टी बिघडायला लागतात." डॉ. स्टीव्ह यासाठी पुरुषांनाही जबाबदार धरतात. ते म्हणतात, "एक तर पुरुष स्पष्ट उत्तर देत नाहीत. काहीवेळा पुरुषांकडे काही उत्तर असत नाही किंवा असं उत्तर असतं जे जोडीदाराला नाराज करू शकेल. पुरुष सततच्या तक्रारींना वैतागतात, कारण त्यांना असे वाटते की, लहान मुलासारखं आपल्याला वागवलं जात आहे."

पुरुषांना होतो असाही फायदा | National Girlfriends Day

कॅनडा येथील हार्ट अँड स्ट्रो फाऊंडेशनने मात्र तक्रारी करण्याचा बायकांचा स्वभाव पुरुषांना अधिक शिस्तबद्ध करतो, असे मह्टले आहे. यामुळेच आपण स्वतःवर नियंत्रण ठेवतो, असे या संस्थेने म्हटले आहे.

'द टाइम्स ऑफ इंडिया'वर यासंदर्भात एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. या लेखात वकील जय वैद्य यांनी मात्र या विरोधात मत नोंदवले आहे. ते म्हणतात, "पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांनी तक्रारी केल्या की त्याला शिस्त म्हटले जाते. या उलट जर महिलांनी तक्रारी केल्या तर त्याला मात्र कटकट समजली जाते."

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news