पृथ्वी शॉ वर हल्ला करणारी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिल कोण आहे?

सपना गिल
सपना गिल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिला आरोपीला अटक केली आहे. सपना गिल असे या महिलेचे नाव असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. आशिवारा पोलिसांकडे याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या हल्ल्यातील महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. सेल्फी घेण्यावरुन पृथ्वी शॉ सोबत सपना गिलचा वाद झाला होता. हा वाद भांडण होण्यापर्यंत गेला. अटक करण्यात आलेल्या सपना गिल आणि तिच्या साथीदारांनी पृथ्वीवर हल्ला केला.

सपना गिल कोण आहे?

सपना गिल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिचे इंस्टाग्रामवर २१८,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स असून तिने आतापर्यंत १,४७१ पोस्ट केले आहेत. सपना गिलने २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका भोजपुरी चित्रपटात देखील काम केले आहे. शिवाय २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या काशी अमरनाथ या चित्रपटात देखील काम केले होते. पृथ्वी शॉ वर हल्ला केला असा आरोप असल्याने सपना गिलला इन्स्टाग्रामवरील चाहत्यांकडून तिला लक्ष केले जात आहे.

पृथ्वी शॉनेच केला सपनावर हल्ला, गिलच्या वकिलांचा आरोप

पृथ्वीने सपनाला मारहाण केली आहे. त्याने एका काठीने ही मारहाण केली. पृथ्वीच्या मित्रांनी प्रथम आमच्या ग्रुपवर हल्ला केला. तसेच सपना सध्या ओशिवार पोलीस ठाण्यात अटकेत असून पोलीस तिला वैद्यकीय उपचारासाठी जाऊ देत नाहीत, असा आरोप आरोपीचे वकिल अली काशिफ यांनी केला आहे.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news