Mira Murati : OpenAI च्या नवीन सीईओ मीरा मुरती कोण आहेत?

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ सॅम ऑल्टमन यांची हकालपट्टी केली आहे. आता सॅम ऑल्टमन यांच्या जागी कंपनीच्या सीईओ म्हणून मीरा मुरती पदभार स्वीकारणार आहेत. सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवल्यानंतर OpenAIचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Mira Murati)

संबंधित बातम्या : 

कोण आहे मीरा मुरती? (Mira Murati)

मीरा मुरती मूळची अल्बेनियन असून तिचे आई-वडील देखील अल्बेनियाचे आहेत. मीरा यांचे शिक्षण कॅनडात झाले असून त्या व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. डार्टमाउथ कॉलेजमध्ये पदवीच्या शिक्षणादरम्यान मीरा मुराती यांनी हायब्रीड रेस कार बनवली होती. (Mira Murati)

मीरा यांनी गोल्डमन सॅकमध्ये इंटर्नशिपही केली आहे. त्यांनी २०१८ मध्ये ओपनएआयमधून करिअरची सुरुवात केली. याआधी त्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी टेस्लामध्ये काम केले आहे. कंपनीची मॉडेल एक्स कार विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी टेस्लामध्ये वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक म्हणून तीन वर्षे काम केले. लीप मोशन या संगणकीय प्रणाली विकसित करणाऱ्या स्टार्टअप कंपनीमध्येही काम केले आहे. (Mira Murati)

ओपनएआयची अंतरिम सीईओ बनल्यानंतर, मीरा यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कंपनीमध्ये नेतृत्वाची भूमिका स्वीकारल्याबद्दल मी सन्मानित आणि कृतज्ञ आहे. मुरती यांनी या पत्रात ऑल्टमन यांच्या अचानक जाण्याबाबत कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news