IAS Harjot Kaur : ‘… तर कंडोमही फ्री द्यावे लागेल’ : मुलीच्‍या कार्यक्रमात बिहारमधील महिला आयएएस अधिकार्‍याची जीभ घसरली

पाटणा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना आयएएस अधिकारी हरजोत कौर.
पाटणा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना आयएएस अधिकारी हरजोत कौर.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कुटुंब नियोजनचा विषय आला तर कंडोमही मोफत द्‍यावे लागतील. तुम्‍हाला सर्व काही मोफत मिळण्‍याची सवय कशी काय लागली आहे, असे वादग्रस्‍त करणार्‍या बिहारमधील महिला आयएएस अधिकारी हरजोत कौर ( IAS Harjot Kaur )  चर्चेत आल्‍या आहेत. त्‍याच्‍या वादग्रस्‍त विधानाचा व्‍हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्‍हायरल झाला आहे.

महिला आणि बाल विकास महामंडळ, युनिसेफ, सेव्‍ह द चिल्‍ड्रन अँड प्‍लॅन इंटरनॅशनल यांच्‍या वतीने 'सशक्‍त बेटी, समृद्‍धी बिहार' कार्यक्रमातंगर्त मंगळवारी पाटणा येथे एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. सरकार शालेय गणवेष मोफत देते; मग सॅनिटरी पॅड मोफत का मिळत नाहीत?, असा सवाल यावेळी एका विद्‍यार्थीनीने केला होता.

काय म्‍हणाल्‍या होत्‍या हरजोत कौर

विद्‍यार्थीनीच्‍या प्रश्‍नावर आयएएस अधिकारी हरजोत कौर म्‍हणाल्‍या की, आम्‍ही २० ते ३० रुपयांचा सॅनिटरी पॅडे देवू शकतो. उद्‍या जीस पँट सुद्‍ध देवू तसेच सुंदर बूटही देतो. शेवटी कुटुंब नियोजनाचा विषया आला की कंडोमसुद्‍धा आम्‍हाला मोफतच द्यावच लागेल . तुम्‍हाला सर्व काही मोफत हवे याची सवय कशी काय लागली आहे, असा सवालही त्‍यांनी केला. तसेच सरकारकडून सर्व मोफत घेण्‍यापेक्षा स्‍वत:ला एवढं संपन्‍न करा की सरकारकडून काही घेण्‍याची गरजच भासू नये. सरकार तुम्‍हाला बरेच काही देत आहे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

IAS Harjot Kaur : पाकिस्‍तानला चालते व्‍हा

लोकांच्‍या मतांवर सरकार बनते, असे उत्तर विद्‍यार्थीनीने कौर यांना दिले. यावर त्‍या म्‍हणाल्‍या की, "हा विचारच मूर्खपणाची पराकाष्‍ठा आहे. तुम्‍ही मतदान करु नका, पाकिस्‍तानला चालते व्‍हा, असेही त्या म्हणाल्या. यावर विद्‍यार्थीनीने, मी भारतीय आहे. पाकिस्‍तानला कशासाठी जावू, असा सवाल केला. यावर तुम्‍ही पैसे आणि सेवेसाठी मतदान करता का? , असा सवालही त्‍यांनी विद्‍यार्थीनीला केला.
माझी प्रतीमा मलीन करण्‍याचा प्रयत्‍न

हरजोत कौर यांचे वादग्रस्‍त विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल झाले. यानंतर त्‍या चर्चेत आल्‍या. आपल्‍या विधानाबाबत खुलासा करताना हरजोत कौर म्‍हणाल्‍या की, महिलांचे अधिकार आणि सबलीकरणा यासाठी मी केलेले प्रयत्‍न सर्वांना माहिती आहेत. यापूर्वी समाज विघातकांवर मी कारवाई केली आहे. त्‍यांनीच कटकारस्‍थान करुन माझी प्रतीमा मलीन करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे, असा दावा कौर यांनी केला आहे. हजजोत कौर १९९२ बॅचच्‍या बिहार कॅडरच्‍या आयएएस अधिकारीआहे. सध्‍या त्‍याच्‍याकडे महिला विकास विभागाच्‍या संचालकपद आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news