Goldy Brar : काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी घेणार गोल्‍डी बरार आहे तरी कोण?

Goldy Brar : काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी घेणार गोल्‍डी बरार आहे तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाबमधील गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या खुनाची जबाबदारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी बरार ( Goldy Brar )  याने स्वीकारली आहे. गोल्डीचा म्‍होरक्‍या आणि तिहार जेलची हवा खात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याने मूसेवाला यांची हत्या घडवून आणल्‍याचे त्‍याने म्‍हटलं आहे. जाणून घेवूया गँगस्‍टर गोल्‍डी बरार विषयी.

Goldy Brar : गोल्‍डीचा पंजाबमधील गंभीर गुन्‍ह्यात सहभाग

सध्‍या कॅनडामध्‍ये वास्‍तव्‍यास असणारा २८ वर्षीय गोल्‍डी बरार याचे मूळ नाव सतिंदर सिंग असे आहे. कॉलेजपासूनच त्‍याचा वावर गुन्‍हेगारांबरोबर सुरु झाला. पंजाब पोलिसांना विविध गुन्‍ह्यात हवा असणारा गोल्‍डीला न्‍यायालयाने फरार घोषित केले आहे. खून, खूनाचा प्रयत्‍न, खंडणी अशा गंभीर स्‍वरुपाचे तब्‍बल १६ हून अधिक गुन्‍हे त्‍यांच्‍यावर दाखल आहेत.

टोळीचा म्‍होरक्‍या लॉरेंस बिश्‍नोई याला अटक झाल्‍यानंतर टोळीचे सर्व व्‍यवहार हे गोल्‍डीकडे आले. पंजाबमधील अनेक गुन्‍ह्यांमधील तो वॉडेंट आहे. काही दिवसांपूर्वी फरीदपूर न्‍यायालयाने जिल्‍हा युवा काँग्रेसचे अध्‍यक्ष गुरलाल सिंह पहलवान यांच्‍या हत्‍या प्रकरणी बरार याच्‍याविरोधातअटक वाँरट जारी केले होते.

कॅनडात राहून पंजाबमध्‍ये काेट्यवधीची खंडणी

रिपोर्टनुसार, १ मे २०२२ रोजी पंजाब गँगस्‍टर प्रतिबंधक पथकाने कारागृहात असणार्‍या गँगस्‍टर लॉरेंस बिश्‍नोई आणि कॅनडास्‍थित गँगस्‍टर गोल्‍डीबरारच्‍या तीन साथीदारांना जेरबंद केले होते. मालवा येथील एका व्‍यापार्‍याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुलीचा त्‍याचा कट असल्‍याचेही पोलिस तपासात स्‍पष्‍ट झाले होते. गोल्‍डी ही कॅनडामध्‍ये राहून पंजाबमधील गुन्‍ह्यात सक्रीय असल्‍याचे पोलिस तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

बिश्नोई यानेच तुरुगांतून मुसेवाला यांच्या खुनाची सुपारी दिली असल्याची कबुली गोल्‍डी याने दिली आहे. बिश्नोईचे दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांत गुन्हेगारीचे जाळे पसरले आहे. बिश्नोई आधी विद्यार्थी चळवळीत कार्यरत होता नंतर त्याने वाहने चोरी सारखे गुन्हे सुरू केले. बिश्नोईच्या गँगमध्ये ७०० च्यावर गुंड आहेत. बिश्नोईने एकदा सलमान खानला ठार करू जाहीर धमकी दिली होती. राजस्थानमधील गँगस्टर आनंदपाल सिंग पोलीस कारवाईत मारला गेला, त्यानंतर सिंग याच्या टोळीतील अनेक गुंड बिश्नोई टोळीत सामील झाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news