Bangladesh Election 2024 : बांगलादेशवर शेख हसीनांचे निर्विवाद वर्चस्व, मात्र संसदेतील ‘विरोधी पक्षा’वरुन पेच!

बांगलादेश संसद (संग्रहित छायाचित्र)
बांगलादेश संसद (संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बांगलादेशच्‍या राजकारणावर विद्‍यमान पंतप्रधान शेख हसीना यांचे निर्विवाद वर्चस्‍व असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍या सलग पाचव्‍यांदा पंतप्रधान होणार आहेत. रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगने ३०० जागांपैकी दोनतृतीयांश जागा जिंकल्या. मुख्य विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि त्याच्या मित्रपक्षांनी बहिष्‍कार टाकलेल्‍या या निवडणुकीत शेख हसीना यांचा विजय केवळ औपचारिकताच होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी सत्ताधारी अवामी लीग आणि प्रमुख विरोधी पक्षाच्‍या विद्यमान खासदारांसह १२ हून अधिक मतदारसंघांत दिग्गजांवर आश्चर्यकारक विजय मिळवला आहे. प्रमुख विरोधी पक्षाला केवळ ८ जागांवरविजय मिळाला असून तब्‍बल ४५ जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्‍यामुळे आता बांगलादेश संसदेत विरोधी पक्ष कोण हा पेच कायम राहिला आहे. ( Bangladesh Election 2024 )

रविवारी झालेल्‍या निवडणुकीत शेख हसीना यांच्‍या अवामी लीगने १५५ जागांवर विजय मिळवला. तर 'बीएनपी'ला फक्त आठ जागा मिळाल्या आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांनी ४५ जागांवर विजय मिळवला आहे. त्‍यामुळे आता बांगलादेश संसदेत विरोधी पक्ष म्‍हणून कोण भूमिका बजावणार हा प्रश्‍न सध्‍या तरी अनुत्तरीत राहिला आहे. ( Bangladesh Election 2024)

Bangladesh Election 2024 : अपक्ष उमेदवारांचा प्रस्‍थापितांना धक्‍का

देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष 'बीएनपी'ने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. अपक्ष उमेदवारांनी अवामी लीग आणि राष्ट्रीय पक्षाच्या विद्यमान खासदारांसह डझनभर दिग्गजांवर आश्चर्यकारक विजय नोंदवला आहे. केवळ आठ जागांसह राष्ट्रीय पक्ष पुन्हा संसदेत अधिकृत विरोधी पक्ष बनेल, असे मानले जात आहे. मात्र अपक्ष उमेदवारांचा विजय देशाच्या राजकारणात नवा पेच निर्माण करु शकतो, असे मानले जात आहे.

अपक्ष उमेदवार संसदेत विरोधी पक्षाची भूमिका बजावतील का हे अद्‍याप स्‍पष्‍ट नाही. काही अपक्ष उमेदवार सत्ताधारी अवामी लीगमध्ये सामील होऊ शकतात मात्र बहुतांश विरोधक म्‍हणूनच भूमिका बजावतील असे मानले जात आहे. सत्ताधारी अवामी लीगने 299 पैकी 211 मतदारसंघांसह पूर्ण बहुमत मिळवले आहे. या अपक्ष उमेदवारांच्या अनपेक्षित विजयाने राजकीय परिदृश्य लक्षणीयरीत्या बदलला असून, विरोधी पक्ष म्‍हणून संसदेत कोण महत्त्‍वाची भूमिका बजावणार या प्रश्‍नाचे उत्तर सध्‍या तरी अनुत्तरीतच आहे.

अवामी लीगचे मित्रपक्ष राष्ट्रीय समाजतांत्रिक दल आणि वर्कर्स पार्टी यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. एकेकाळी बीएनपी आघाडीत असलेल्या कल्याण पक्षानेही एक जागा जिंकली. देशाच्या राजकारणात मोठी शक्ती असूनही, बीएनपी संसदेबाहेर राहिल्‍याचे चित्र आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news