पुढारी ऑनलाईन : अब्जाधिश असलेले एलन मस्क यांच्याकडे नुकतीच ट्विटरची मालकी आली. यानंतर ट्विटरच्या पक्षाला मुक्त केल्याचे ट्विट करत त्यांनी ट्विटरचा ताबा घेतला. यानंतर काही क्षणातच त्यांनी ट्विटरचे मुख्य कार्यक्रारी अधिकारी पराग अग्रवाल यांच्यासह ट्विटरमधील चार मुख्य पदाधिकाऱ्यांना काढून टाकले. यामध्ये ट्विटरचे मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांच्यासह ट्विटरच्या कायदेशीर व्यवहार आणि धोरण प्रमुख विजया गाड्डे (Vijaya Gadde) यांनादेखील मस्क यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.
ट्विटर सोडताना मात्र या तिन्हीही अधिकाऱ्यांना भरघोस मोबदला मिळाला आहे. फ्री प्रेस जर्नलनुसार यामधील विजया गाड्डे यांना ६१० कोटी, सेगन यांना ५४४ कोटी तर अग्रवाल यांना ५३६ कोटी रूपये ट्विटरकडून देण्यात आले आहे. गाड्डे या बाह्मणविरोधी असल्याने मस्क त्यांच्याकडून कारवाई करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. ट्विटरमधून अधिकाऱ्यांना काढून टाकणे हे काही नवीन नाही. कारण यापूर्वी देखील ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील बनावट खात्यावरील वास्तविक माहिती देत गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी मस्क यांनी अनेकांना काढून टाकले होते.
भारतीय अमेरिकन असलेल्या गाड्डे यांना गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील उच्चवर्णीय भारतीय तसेच अमेरिकन लोकांकडून होणाऱ्या ऑनलाईन गैरवर्तनाचा सामना करावा लागला होता. २०१८ मध्ये स्मॅश ब्राह्मणी पितृसत्ता फोटोवरून तर नंतर डोनाल्ट ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद केल्याप्रकरणी त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यानंतर ट्विटरचे काही शेअर्स खरेदी केल्यानंतर एलन मस्क यांनी गाड्डे यांना त्याच्या डाव्या विचारसरणीवर आणि काही लोकांचे ट्विटर अकाऊंट बंद केल्याप्रकरणी चांगलेच सुनावले होते.
विजया गड्डे यांचा जन्म 1974 मध्ये भारतातील हैदराबाद येथे एका तेलुगू कुटुंबात झाला. ती तीन वर्षाची होईपर्यंत तिच्या वडिलांना भेटली नव्हती. 2014 मध्ये फॉर्च्यूनला दिलेल्या मुलाखतीत, गाड्डे यांनी आठवण एक आठवण सांगितली आहे ती म्हणजे, तिचे वडील त्यावेळेस अमेरिकेत गरीब पदवीधर विद्यार्थी होते आणि ते त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत किंवा आधार देऊ शकत नव्हते.
गाड्डे या टेक्सासमधील एका छोट्या गावात वाढल्या आहेत, जिथे मोजकेच भारतीय राहत होते. त्या ज्या ठिकाणी राहत होत्या तिथे क्लू- क्लक्स-क्लान या गटाचे (अमेरिकन गोरा वर्चस्ववादी, उजव्या विचारसरणीचा, दहशतवादी गट) वर्चस्व होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्णभेद होता. यावेळी एका मॅक्झिनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, मी तेव्हा लहान होते. माझ्या वडिलांना त्यांच्या विमा विकायचा होता. पण यासाठी त्यांना या अमेरिकन वर्चस्ववादी गटाची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यावेळी हे योग्य नसल्याची मला जाणीव झाली. या वर्चस्ववादी विचारसरणीबद्दल माझ्या मनात चीड निर्माण झाली आणि त्याचवेळी मी वकील बनण्याचा निर्णय घेतला, असे त्या म्हणतात.
यावेळी आलेली चीड मनात धरून विजया यांनी त्याची शैक्षणिक घोडदौड सुरू केली. त्यांनी न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठातून औद्योगिक आणि कामगार संबंध या विज्ञान विषयातील पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्क विद्यापीठात गेल्या. कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रथम ज्युनिपर नेटवर्क्स या कंपनीतील लीगल विभागात वरिष्ठ संचालक म्हणून काम पाहिले. यानंतर त्या २०११ पासून ट्विटरमध्ये दाखल झाल्या. या ठिकाणी गाड्डे यांच्याकडे खोट्या बातम्या आणि छळासंदर्भातील ट्विटची संदर्भातील जबाबदारी होती.
विजया गाड्डे यांचा विवाह वकील आणि टेक एक्झिक्युटिव्ह असलेल्या रामसे होम्सनी यांच्याशी झाला आहे. त्यांना दोन मुलेही आहेत. हे दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य लोकांपासून दूर ठेवत आले आहेत. भारतीय अमेरिकन असलेल्या विजया गाड्डे जरी अमेरिकन कल्चरमध्ये रहात असल्या तरी त्यांनी ट्विट केलेल्या अनेक ट्विटवरून असे दिसते की त्या अनेक गणेश चतुर्थी आणि दिवाळी यांसारखे भारतीय सण उत्सव साजरे करतात. यावरून त्या तेलगु-हिंदू संस्कृतीशी घट्ट बांधल्या गेल्याचे दिसून येते.