पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना विषाणू नवा सब व्हेरियंट ( विषाणूचे उत्परिवर्तन) JN.1 मुळे पुन्हा एकदा जगभरातील चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या सब व्हेरियंटचा समावेश 'व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट' यादीत केला आहे. यामुळे आता या कोरोना विषाणूमध्ये झालेल्या उत्परिवर्तनाचे स्वतंत्रपणे वर्गीकरण करण्यात आले आहे. यासंदर्भात WHO ने एक निवेदनही जारी केले आहे. ( JN1 variant)
WHO ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना नवीन 'JN.1' या सब व्हेरियंटचा समावेश 'व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट' यादीत करण्यात आला आहे. 'JN.1' पूर्वी त्याच्या मूळ वंशाच्या BA.2.86 एक प्रकार म्हणून वर्गीकृत करण्यात आला होता. मात्र आता थंडीच्या दिवसांमध्ये नव्या व्हेरियंटचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता त्याचे स्वतंत्रपणे वर्गीकरण करण्यात आले आहे. ( WHO Classifies JN1 as variant of interest )
'डब्ल्यूएचओ' स्पष्ट केले आहे की, "कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा नागरिकांना मोठा धोका नाही. कारण आतापर्यंत आढळलेल्या रुग्णाची परिस्थिती पाहता, JN.1 आरोग्यासाठी धोकादायक नाही. सध्याची लस त्यात प्रभावी आहे आणि रुग्णांना त्याच्या धोक्यापासून वाचवते."
कोरोनाच्या नवीन व्हेरियंटवर जागतिक आरोग संघटनेने (WHO) अॅडव्हायजरी जारी केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. कोविड पॉझिटिव्ह रूग्णांवर फक्त PPE किट घालून उपचार करा आणि व्हेंटिलेटर सुविधा सुरळीत चालू ठेवाव्यातलोकांनी गर्दीच्या, बंद किंवा खराब हवेच्या ठिकाणी मास्क घालावे. तसेच, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
दक्षिण भारतात प्रवास करून परतलेल्या गुजरातमधील दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. गुजरातमधील गांधीनगर येथे राहणाऱ्या दोन कोरोना पॉझिटिव्ह महिलांना घरातच वेगळे करण्यात आले आहे. केरळमध्ये JN.1 प्रकरणे समोर आल्यानंतर दक्षिण भारतातून परतणाऱ्या पर्यटकांवर विशेष लक्ष ठेवले गेले. गुजरातमधील या दोन महिलांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही महिलांमध्ये सर्दी आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती.
अमेरिकेतील विषाणू प्रतिंबधक आणि नियंत्रण केंद्राने ( सीडीसी ) डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होत की, अमेरिकेतील कोरनाचे सुमारे १५ ते २९ टक्के रुग्णांना नवा सब-व्हेरियंट JN.1ची लागण झाली आहे. मागील आठवड्यात चीनमध्ये JN.1 ची बाधा झालेले सात रुग्ण आढळले होते.
हेही वाचा :