‘ई-श्रम’वर नोंदणी केल्यास २ लाखांचा अपघाती विमा, असे करा रजिस्ट्रेशन

‘ई-श्रम’वर नोंदणी केल्यास २ लाखांचा अपघाती विमा, असे करा रजिस्ट्रेशन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रातील मोदी सरकारने असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी ई श्रम पोर्टल (E Labor Portal) सुरू केलेले आहे. या माध्यमातून भारतीय कामगारांना त्यांच्या कौशल्यावर आधारीत रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ई श्रम पोर्टलवर आपल्या नावाची नोंद करावी लागेल. त्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या eshram.gov.in या वेबसाइटवर ई-श्रम कार्ड रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाइन भरता येईल.

अशी करा नोंदणी  

– https://register.eshram.gov.in/#/user/self या वेबसाईटवर जावा.

– Register on E-shram या पर्यायावर क्लिक करा.

– त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल.

– फॉर्ममध्ये आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर, कॅप्चा कोड भरा.

– आता रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. हा ओटीपी बॉक्स मध्ये भरा.

– त्यानंतर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही ई-श्रम पोर्टलवर रजिस्टर करू शकता.

– फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

– त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.

– याबाबत अधिक माहितीसाठी कृपया श्रम और रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटसोबत eshram.gov.in ही वेबसाईट बघा.

E Labor Portal : ई-श्रम कार्डचे फायदे ?

असंघटीत क्षेत्रातील कामगारांची या पोर्टलवर नोंद झाली असल्यास त्यांना केंद्र सरकारच्या वतीने २ लाखांचा अपघाती विमाचे कवच मिळेल. तसेच प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना, राष्ट्रीय पेंशन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेंशन योजना यासह अनेक योजनांचा थेट फायदा कामगारांना मिळू शकतो.

'ई श्रम' पोर्टलवर नोंद झालेल्या कामगाराचे वय १८ ते ५९ च्या दरम्यान असावे. तसेच कामगाराने आयकर भरलेला नसावा. तो ईपीएफओ, ईएसआईसी चा सदस्य नसावा. त्याचबरोबर 'ई श्रम' पोर्टलवर नाव नोंद झालेल्या कामगाराला श्रम मंत्रालयाच्या वतीने १२ डिजिट युनिवर्सल अकाउंट नंबर देण्यात येईल. नाव नोंदविण्यासाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, मोबाइल नंबर, बँक खाते, रेशनकार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : विधानसभा निवडणूक : भाजपाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव नेमका कशामुळे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news