White Tigress Vina Rani : ‘दिल्ली’ प्राणी संग्रहालयातील प्रमुख आकर्षण असलेली ‘पांढरी वाघीण वीणा राणी’चा मृत्यू

white tigress veena rani
white tigress veena rani

पुढारी ऑनलाइन डेस्क : दिल्लीच्या प्राणी संग्रहायलातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या पांढ-या वाघिणीचा सोमवारी मृत्यू झाला. वीणा राणी (White Tigress Vina Rani), असे या मृत झालेल्या पांढ-या वाघिणीचे नाव आहे. ती 17 वर्षाची होती. तिला हिपॅटायटीसचा त्रास होता. त्यामुळे तिचे यकृत बिघडले होते.

प्राणी संग्रहालयाच्या अधिका-यांनी सांगितले की, (White Tigress Vina Rani) वाघिणीने शनिवारपासून अन्न घेतले नव्हते. त्यामुळे तिला आहारात फक्त सूप ठेवण्यात येत होते. मात्र, अखेर वय आणि आजारपणाला कंटाळून तिचा मृत्यू झाला. वीणा राणीच्या मृत्यूबद्दल प्राणी संग्रहालयाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "आम्ही तिला शनिवारी रात्री खायला दिले होते, पण रविवारी सकाळी आम्ही तपासले तेव्हा आम्हाला आढळले की तिने जेवण केले नव्हते. आम्ही नंतर तिला सूप दिले आणि रक्ताचा नमुना घेतला. त्यात क्रिएटिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तिचे हिपॅटायटीस आणि यकृत निकामी झाले होते. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, वीणा उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. अखेर सोमवारी संध्याकाळी वीणाचा मृत्यू झाला."

White Tigress Vina Rani : वीणा राणी होती पर्यटकांची प्रमुख आकर्षण

दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात दररोज शेकडो पर्यटक भेट देतात. या भेटीमध्ये पांढरा वाघ पाहणे हे पर्यंटकांचे मुख्य आकर्षण असते. कारण पांढरा वाघ हा भारतातील बंगालच्या वाघाचा रांगद्रव्य आहे. हा बंगालचा वाघ बंगालची विशेष ओळखही आहे. त्याला बंगाल टायगर असेही म्हणातात. तो सुंदरबन प्रदेशात आढळतो. तसेच मध्य प्रदेश, आसाम, बिहार, ओडिसा या राज्यांतील जंगलातही हा वाघ आढळतो. त्यामुळे पर्यंटकांसाठी दिल्लीच्या प्राणी संग्रहालयात पांढरा वाघ पाहणे हे मुख्य आकर्षण असते. वीणा राणी ही प्राणी संग्रहालयाती प्रौढ वाघीण होती. त्यामुळे तिला पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करायचे.

प्राणी संग्रहालयाच्या संचालक आकांक्षा महाजन यांनी वीणा विषयी अधिक माहिती देताना सांगतिले की, वीणा राणी ही तिस-या पिढीतील पांढरी वाघीण होती. तिचे पालक यमुना आणि लक्ष्मण हे होते. तसेच तिच्या आजी-आजोबांचा जन्मही याच प्राणीसंग्रहालयात झाला होता. मात्र, वीणा राणीने कोणत्याही पिल्लाला जन्म दिला नव्हता.

White Tigress Vina Rani : प्राणी संग्रहालयातच होणार अंत्यसंस्कार

तज्ज्ञानी सांगितले की, शक्यतो प्राणीसंग्रहालयात जन्मलेली आणि वाढलेली वाघीण सामान्यपणे 15 ते 19 वर्षे जगते. राणी ज्या परिस्थितीतून जात होती अशी परिस्थिती वृद्धत्वामुळे निर्माण होते. दरम्यान, अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीना राणीवर प्राणी संग्रहालयातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

White Tigress Vina Rani : प्राणी संग्रहालयात आता उरले तीन प्रौढ वाघ

वीणा राणीच्या निधनानंतर आता प्राणीसंग्रहालयात टिपू, विजय आणि सीता असे तीन प्रौढ वाघ आहेत. तसेच विजय आणि सीता यांची दोन पिल्ले देखील आहेत. त्यांचा गेल्या वर्षीच जन्म झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news