आता दूध खरेदी दरात घसरण होऊन प्रतीलिटर 10 – 12 रुपयांनी घट झाल्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक केलेले दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. बँका, सोसायटी, खासगी पतसंस्थांचे कर्ज काढून गायी, म्हशी खरेदी केलेल्या दूध उत्पादक शेतकर्यांची आर्थिक अवस्थाही बिकट झाली आहे. दुष्काळ परिस्थितीने हिरव्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पशुखाद्याच्या दरातही भरमसाठ वाढ झाली आहे. पशुखाद्याच्या 50 किलोच्या बॅगेमागे 150-200 रुपयांनी वाढ झाली आणि आता दुधाच्या दरात 10 ते 12 रुपयांनी घट झाल्याने दूध व्यवसाय करणारे शेतकरी पुरते संकटात सापडले आहेत. दुधाची पावडर निर्यात अनुदान योजनेबाबत शासनाच्या उदासीनेतेमुळे कारखाने, दूध संकलन संस्थांबरोबरच पावडरनिर्मिती करणारे उद्योग व दूध उत्पादकांनाही अडचणीत आणले आहे.