WhatsApp : दोन तासानंतर व्हॉट्सॲप सेवा पूर्ववत

WhatsApp : दोन तासानंतर व्हॉट्सॲप सेवा पूर्ववत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : गेल्या दोन तासांपासून व्हॉट्सॲप सेवा बंद होती. व्हॉट्सॲप बंद असल्याने ना मेसेज येत होते, ना जात होते. त्यामुळे जगभरातील यूजर्संचा मोठ्याप्रमाणात गोंधळ उडाला होता. कोणत्याही प्रकारचा संवाद न करता आल्याने व्हॉट्सॲप यूजर्संचा जीव मेटाकुटीला आला होता. पण तब्बल दोन तासांनंतर पुन्हा व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. त्यामुळे यूजर्संनाही काहीसा दिलासा मिळाला नाही.

WhatsApp हे इन्स्टंट कम्युनिकेशन ॲप आहे. व्हॉटस्ॲप डाउन झाल्याने ग्रुपवर मेसेज पाठवणे अशक्य झाले आहे. व्हॉट्सॲप मेसेजिंग ॲप हे जगभरातील कोट्यवधी मोबाइल युजर्सच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात अन्न, पाणी, निवारा याचबरोबर व्हॉट्सॲप हेदेखील एक अत्यावश्यक साधन आहे. वैयक्तिक चॅट्सवरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. आउटेज डिटेक्शन वेबसाइट DownDetector याची पुष्टी करत म्हटले आहे की WhatsApp डाउनचा लाखो यूजर्संना फटका बसला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनऊसह भारतातील अनेक भागांत व्हॉट्सॲप चालत असल्याचे आढळून आले आहे.

आज दुपारी १२.०७ मिनिटांनी व्हॉट्सॲप डाउन झाल्याचे Down Detector ने म्हटले आहे. मेसेज जाणे बंद झाले आहे. तसेच सर्व्हर डिसकनेक्शन आणि हे ॲप क्रॅश झाल्याच्या तक्रारी यूजर्संनी केल्या आहेत. भारतासह इटली, तुर्की या देशांतही व्हॉट्सॲप डाउन झाल्याचे तिथल्या यूजर्संनी ट्विट करत म्हटले आहे. यानंतर आम्हाला माहिती आहे की, काही लोकांना सध्या मेसेज पाठवताना समस्या येत आहेत.आम्ही शक्य तितक्या लवकर प्रत्येकासाठी WhatsApp रिस्टोअर करण्यासाठी काम करत असल्याचे मेटा कंपनीच्या एका प्रवक्त्यांने स्पष्ट केले होते.या घटनेनंतर  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल होत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news